आपल्या समाजासमोर अनेक प्रश्न "आ' वासून उभे असतात. अशा प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोपी व व्यवहार्य असतात, मात्र प्रश्न आणि उत्तर यांच्या सांगड घालण्याच्या मानसिकतेसंदर्भातील अभावामुळे प्रश्न सुटणे कठीण होते. हेच उसाच्या अतिरिक्त मळीचे काय करावे, याबाबत झाले आहे. मात्र या प्रश्नाचा बागुलबुवा न करता त्यावर सुटसुटीत व व्यवहार्य तोडगा काढणे शक्य असल्याचे मत पुणे येथील अभ्यासक दीपक कान्हेरे यांनी व्यक्त केले आहे.
पाऊस चांगला झाल्याने उसाचे बंपर पीक आले, त्यामुळे लांबलेला कारखान्यांचा गळीत हंगाम, तसेच वाढीव गाळप आणि उद्भवलेला मळी (मोलॅसिस)चा प्रश्न निर्माण झाला.
एखाद्या साखर कारखान्याने आपली गाळपक्षमता वाढवली, तर साखरेचे उत्पादन वाढणार हे निश्चित! मात्र त्याच प्रमाणात मळीचे उत्पादनदेखील वाढणार हे तितकेच खरे. सहकार खात्याने या वाढीव क्षमतेला परवानगी देताना मळीच्या विल्हेवाटीचा अगर साठवणुकीचा अंदाज घेतला नव्हता का? असा प्रश्न पडतो. किंबहुना मळीचे वाढीव उत्पादन आणि त्यावर आधारित कारखान्यांचा मद्यार्कनिर्मिती प्रकल्प यातून साधली जाणारी नफ्याची व्यावहारिक गणितेही लक्षात घेतली पाहिजे.
मळीतून मद्यार्क काढल्यावर शिल्लक उरणाऱ्या "स्पेंट वॉश'वर अनेक कारखाने बायोमिथेनेशन तत्त्वाने जैववायू (बायोगॅस) निर्मिती करून आपले सहवीजनिर्मिती (को-जनरेशन) प्रकल्प अतिशय व्यवहार्यपणे चालवीत आहेत. अतिरिक्त मळीचे काय करावे? या "ऍग्रोवन'मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीतील आकडेवारी लक्षात घेता केवळ सोदाहरण स्पष्ट व्हावे म्हणून एक व्यावहारिक पर्याय येथे मांडत आहे.
एकूण साखर कारखाने- 161
मळीची वाढीव उपलब्धता - 12 लाख मे. टन
या दोन आकडेवारींचा संदर्भ लक्षात घेता असे म्हणण्यास हरकत नाही की संपूर्ण वर्षभरात प्रति कारखान्यामागे सुमारे 7400 मे. टन एवढ्या मळीची विल्हेवाट करावी लागेल, म्हणजेच प्रति दिन सुमारे 20 टन मळीची वासलात लावणे हा मूळ प्रश्न आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...