1) रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख्येनुसार पाच ते दहा मी. लांब आकाराचे वाफे तयार करावेत. एक ब्रास पोयट्याची माती, चांगले कुजलेले शेणखत (3-1) या प्रमाणात घेऊन यामध्ये 25 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून चांगले मिश्रण करावे. हे मिश्रण 5 ु 7 इंच आकाराच्या व तळाला पाच ते सहा छिद्रे असलेल्या प्लॅस्टिक पिशवीत भरावे. पिशवीचा वरचा एक ते दीड इंच भाग पाणी देण्यासाठी मोकळा ठेवावा.
2) पिशव्या झारीच्या साह्याने किंवा पाइपच्या किंवा वाफ्यात पाणी सोडून चांगल्या भिजवून घ्याव्यात.
3) लागणीसाठी नऊ ते 10 महिने वयाचे चांगले रसरशीत ऊस बेणे निवडावे. या बेण्यापासून 1.5 ते 2.5 इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.
4) हे एक डोळ्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे 0.1 टक्का कार्बेन्डाझिमच्या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून नंतर ऍसिटोबॅक्टर + ऍझोटोबॅक्टर + ऍझोस्पिरिलम + स्फुरद विरघळविणारे जिवाणू एका एकरासाठी 500 ग्रॅम असे एकूण दोन किलो, 15 ते 20 किलो शेणाच्या स्लरीत पाच ते 10 मिनिटे बुडवून पाच मिनिटे सावलीत वाळवून नंतर लागवडीसाठी वापरावे.
5) डोळा असलेला भाग पिशवीत वरच्या बाजूस राहून कांडीचा सर्व भाग मातीखाली झाकला जाईल याची काळजी घेणे जरुरीचे असते. या पिशव्यांना दर तीन-चार दिवसांतून झारीच्या अथवा पाइपच्या साह्याने वाफ्यात पाणी द्यावे. एक ते दीड महिन्याच्या रोपांना तीन-चार हिरवी पाने आल्यानंतर शेतात लागवड करावी.
1) सुरवातीचा उगवणीचा काळ, एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे पिशवीत वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेण्यास किंवा हंगामामधील घेतलेल्या पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे पिशवीत वाढवून हंगाम साधता येतो.
2) रोपांची लागवड केल्यामुळे 90 ते 100 टक्के उगवण होऊन योग्य प्रमाणात फुटव्यांचे प्रमाण ठेवून एका रोपाला सरासरी नऊ ते 10 गाळण्यालायक व अधिक वजनाच्या उसाची संख्या साधता येते.
3) सर्व रोपांना सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी आणि वाढीचे इतर घटक योग्य व सारख्या प्रमाणात मिळाल्यामुळे सर्व उसाची वाढ एकसारखी होऊन उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते.
4) क्षारपड जमिनीत उसाची उगवण खूपच कमी होते किंवा उगवलेल्या रोपांचा जोम कमी राहतो; परंतु प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करून लागण केल्यास रोपांचा वाढीचा जोर चांगला राहून वाढ चांगली राहते.
5) लागवड केलेल्या उसातील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीतील रोपांचा वापर फायदेशीर असतो.
- 02169 - 265333
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...