मराठवाड्यात ऊस लागवडीसाठी को 86032, को 94012, कोसी 671, कोव्हीएसआय 9805, कोएम 265 या जातींची शिफारस आहे. उसाला खते देण्यासाठी लागवडीवेळी दहा टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाश द्यावा.
1) पूर्वहंगामी उसासाठी खतांची मात्रा - 300-170-170
पैकी लागवडीवेळी - 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश द्यावे.
लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी - 120 किलो नत्र द्यावे.
12 ते 16 आठवड्यांनी - 30 किलो नत्र द्यावे.
मोठ्या बांधणीवेळी - 120 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश द्यावे.
2) सुरू उसासाठी मात्रा - 250 - 115 - 115,
लागवडीवेळी - 25 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश द्यावे.
लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी - 100 किलो नत्र,
लागवडीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी - 25 किलो नत्र
मोठी बांधणीच्या वेळी - 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश द्यावे.
उन्हाळ्यात ऊस पिकाला पाण्याचा ताण पडला तर किंवा पाणी कमी पडत असेल तर अडीच किलो युरिया आणि अडीच किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति 100 लिटर पाण्यातून 15 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. अधिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा .
संपर्क - प्रा. पी. ए. पगार, - 7588159802
प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र, वसमतनगर, जि. हिंगोली
---------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...