1) ऊस रोपवाटिकेसाठी बेणे मळ्यातील नऊ ते 11 महिने वयाचे, सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्यांचे, निरोगी बेणे वापरावे. बेणे तोडल्यापासून शक्यतो 24 तासांच्या आत त्याची लागवड करावी.
2) प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात, त्यासाठी ऊस लागणीअगोदर एक महिना ट्रेमध्ये रोपे तयार करावीत.
3) बेणेमळ्यातील बेणे आणल्यानंतर एक इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.
4) एक डोळ्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे कार्बेन्डाझिमच्या (10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाणी) द्रावणात बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत.
5) बेणे थोडे सुकल्यानंतर जिवाणूसंवर्धनाची बेणेप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात एक किलो ऍसिटोबॅक्टर + एक किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) + 1.5 ते 2 किलो शेण मिसळून त्यात 30 मिनिटे बेणे बुडवून नंतर पाच मिनिटे सावलीत सुकवून ट्रेमध्ये लागवडीसाठी वापरावे.
6) 25 किलो कोकोपीटमध्ये साधारणपणे दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो युरिया चांगले मिसळून, ते प्लॅस्टिक ट्रेमध्ये कपात एक तृतीयांश भरून घ्यावे. नंतर त्यावर एक डोळा कांड्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा कोकोपीट टाकून ट्रे पूर्ण भरून घ्यावेत.
7) ऊस बेणे लागण झाल्यावर गरजेनुसार झारीने अथवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.
8) ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर शेतात लागणीसाठी वापरावीत.
संपर्क - 02169 - 265334
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव,
ता. फलटण, जि. सातारा
-----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
चांगला निचरा होणारी मध्यम खोल काळी सुपीक जमीन निवड...
वाळवा तालुक्यातील (जि. सांगली) शेतकरी ऊस उत्पादनव...
पपईच्या चांगल्या उत्पादनासाठी साधारण फेब्रुवारीच्य...
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडी...