ऊस पिकाच्या एक हेक्टर क्षेत्रामधून सुमारे दहा ते बारा टन वाळलेले पाचट मिळते. ते शेतात पसरून योग्य पद्धतीने कुजविल्यास अनेक फायदे मिळतात.
जमिनीवरील आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी होते. जमिनीतील ओलावा पंधरा ते वीस दिवस टिकून राहतो. यामुळे पाणी पाळ्यातील अंतर वाढते. सध्या उसाला हेक्टरी अडीच ते साडेतीन कोटी लिटर पाणी दिले जाते. पाचट आच्छादन व एक आड एक सरीत पाणी देण्यामुळे एक ते दीड कोटी लिटर पाणीबचत होते. शिवाय केशाकर्षनाद्वारा पाचट ठेवलेल्या सरीतील माती पाणी शोषते. लवकर वाफसा येतो. यामुळे मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
पाचट शेतात ठेवल्याने पाल्यातील मुख्य अन्नद्रव्ये उदा. नत्र 40 ते 50 किलो, स्फुरद 20 ते 30 किलो, पोटॅश 75 ते 100 किलो, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये, लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होतात. याचा उत्पादनवाढीवर अनुकूल परिणाम दिसून येतो. पाचट तंत्रज्ञानामुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते.
रुंद सरीवर उसाची लावण केल्याने जमिनीवर अधिक काळ सूर्यप्रकाश राहतो. पाचटाच्या आच्छादनामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. तसेच पाला कुजून सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते, त्यामुळे जीवाणू व गांडुळांची नैसर्गिकरीत्या वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून ती पिकास सुलभ उपलब्ध होतात.
डॉ. एस. बी. पवार, 9422178982
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...