सद्य परिस्थितीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्य पुरवठा करणाऱ्या रासायनिक खतांपैकी नत्रयुक्त खतांची उपयुक्तता ही 40 ते 50 टक्के, स्फुरदयुक्त खतांची उपयुक्तता 15 ते 20 टक्के, तर पालाशयुक्त खतांची उपयुक्तता 70 ते 80 टक्केपर्यंत आहे. नत्रयुक्त खतांमधील नत्र हवेमध्ये बाष्पीभवनावाटे ऱ्हास होते, निचऱ्यावाटे वाहून जाते, स्थिरीकरण होते. स्फुरदयुक्त खतांमधील स्फुरदाचे अतिद्राव्य घटकामध्ये रूपांतर होते किंवा हालचाल कमी होते. पालाशयुक्त खतांमधील पालाशचे जमिनीतील वेगवेगळ्या स्थित्यंतरामुळे पिकास योग्य वेळी उपलब्ध होत नाही.
या कारणांमुळे पिकास मुख्य अन्नद्रव्य पुरवणाऱ्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविणे सद्य परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. खत वापरण्याची पद्धत
रासायनिक खते पेरून दिल्यामुळे ती मुळांच्या कार्यक्षेत्रात पडतात व पिकाला शोषून घेणे सोईस्कर होते. ऊस पिकासाठी कमीत कमी 10 ते 15 सें.मी. खोलीवर खते द्यावीत. स्फुरद व पालाशयुक्त खतांमधील अन्नद्रव्ये जमिनीमध्ये हळूहळू उपलब्ध होत जातात. अशी खते मुळांच्या सान्निध्यात दिल्याने त्यांची उपयुक्तता व कार्यक्षमता वाढते.
खते देताना पीकवाढीच्या अवस्थांबद्दल विचार करणे गरजेचे आहे. नत्रयुक्त खतांच्या बाबतीत विचार केला तर ही खते पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात कमी प्रमाणात लागतात, त्यामुळे ही खते एकाच वेळी दिली गेली तर पाण्याद्वारे वाहून जातात, त्यामुळे खतांची उपयुक्तता कमी होते. त्यामुळे नत्रयुक्त खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी अशी खते एकाच वेळी न देता पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावीत.
ऊस पिकाच्या बाबतीत नत्रयुक्त खते ही दहा टक्के लागणीच्या वेळी, 40 टक्के लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी, दहा टक्के लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी आणि 40 टक्के मोठ्या बांधणीच्या वेळी अशा प्रकारे चार वेळामध्ये विभागून द्यावीत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार खते देण्याची वेळ निवडावी. खते दिल्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.
- 02169 - 265333,334
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,
पाडेगाव, जि. सातारा
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...