कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जातीपेक्षा उसाचे उत्पादन 21.21 टक्के, साखर उत्पादन 27.26 टक्के जास्त मिळते. खोडवा पिकाचे चांगले उत्पादन मिळते.
या जातीची जाडी आणि वजन जास्त असल्याने ऊस उत्पादनात चांगली वाढ मिळते. ऊस तोडणीपर्यंत (14 महिने आणि जास्त) सरळ वाढत (न लोळणारा) असणारी ही जात असल्याने ठिबक सिंचन व्यवस्थापन करणे सोपे जाते. तसेच यंत्राच्या साह्याने लागवड व तोडणी करणे शक्य आहे.
या जातीला तुरा येत नाही. त्यामुळे ऊस व साखर उत्पादनात घट होत नाही. तोडणी कार्यक्रम उशिरापर्यंत राबविण्यास उपयुक्त आहे. हलक्या, मध्यम ते भारी जमिनीत या जातीचे चांगले उत्पादन मिळते.
ही जात वाढीच्या अवस्थेत काही प्रमाणात पाण्याचा ताण सहन करते.
या जातीच्या उसात दशीचे प्रमाण आढळून येतात, उसास पांक्षाही फुटत नाहीत.
ही जात खोड कीड, कांडी कीड, पिठे कीड व लोकरी मावा या किडींस, तसेच गवती वाढ, पोक्का बोंग लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. ही जात काणी व तांबेरा या रोगांना प्रतिकारक आहे.
संपर्क
20-26902246
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे.माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...