शिसम वृक्षाच्या लाकडाचा उपयोग फर्निचर बनविण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे लाकूड इमारत बांधणी, पेपर उद्योग, कोळसानिर्मिती आणि जळणासाठी वापरले जाते. शिसमची रोपे रोपवाटिकेमध्ये वाफ्यावर अथवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये तयार केली जातात. बियाणे पेरल्यानंतर आठ- दहा दिवसांनंतर उगवण्यास सुरवात होते. विसाव्या दिवसापर्यंत सर्व बियाणे उगवून येते. उगवणक्षमता 90 ते 96 टक्क्यांपर्यंत मिळते. बियाणे पेरण्यापूर्वी 24 तास गार पाण्यात ठेवून पेरल्यास उगवण एकसारखी व लवकर होते. याची योग्य पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास रोपे तयार करून चांगले व्यवस्थापन केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. या वृक्षाला मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली मानवते. लागवड 5 x 5 मीटर अंतराने 1 x 1 x 1 फूट आकाराचे खड्डे घेऊन करावी. लागवड करते वेळी मे महिन्यात खोदून ठेवलेले खड्डे भरताना जमिनीच्या वरच्या थरातील माती खड्ड्यात खाली टाकून वर पालापाचोळा, कंपोस्ट, शेणखत व माती याने खड्डे भरून, वर डोंब करून ठेवावा. पाऊस सुरू असताना जून- जुलै महिन्यात लागवड केल्यास झाडांची मर कमी होते. लागवड करताना एक वर्षाची रोपे वापरावीत. हे झाड भरभर वाढते, त्यामुळे विरळणी, फांद्यांची छाटणी नियमित करावी लागते.
लेखक -अरुण शिरसाट, साखरपा, जि. रत्नागिरी
संपर्क - 02358 - 283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोलीमाहिती संदर्भ :अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मात...
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड...
तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमी...
तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा ...