1) तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा कोणत्याही प्रकाराच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते. जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. चिबड व पाण्याचा निचरा न होणारी जमीन तुती लागवडीसाठी निवडू नये.
2) जून- जुलै महिन्यांपर्यंत जमीन तयार करून लागवड करावी. लागवडीपूर्वी वखराच्या साह्याने समपातळीत करून घ्यावी. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत सारख्या प्रमाणात पसरून द्यावे.
3) राज्यात एम-5, एस-36, एस-13 आणि एस-54 या जातींची वाढ चांगली होऊन पानांचे अधिक उत्पादन मिळते.
4) म्हैसूर येथे व्ही-1 ही सुधारित जात विकसित करण्यात आली आहे. खताची वाढीव मात्रा व चांगल्या दर्जाच्या जमिनीमध्ये ही जात लागवडीस अत्यंत फायदेशीर आहे. चॉकी कीटक संगोपनासाठी तुती लागवडीच्या दहा टक्के क्षेत्रामध्ये एस-30 किंवा एस-36 या तुतीच्या जातीची लागवड करून अत्यंत पोषक पानांचा वापर अळ्यांसाठी करावा.
5) साधारण सहा ते आठ महिने जुने व बागेस पाणी दिलेले तुतीचे बेणे म्हणून वापर करावा. या फांद्या रंगाने भुरकट व आकाराने 10-15 मि.मी. जाडीच्या 18 ते 20 सें.मी. लांबीच्या आणि तीन ते चार डोळे असलेल्या असाव्यात. कलमे तीक्ष्ण हत्याराच्या साह्याने, डोळ्यालगत तिरपा काप घेऊन, तर वरच्या भागाचा काप सिकेटरच्या साह्याने डोळ्यांच्या वर आडवा घ्यावा. लागवड करताना कलमाचे दोन भाग जमिनीच्या आत, तर एक भाग जमिनीच्या वर राहील व कलम उलटे लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तुतीचे बेणे एक टक्का कार्बेन्डाझिम द्रावणामध्ये चार ते पाच तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.
6) पट्टा पद्धतीने 5 x 3 x 2 फूट अंतराने लागवड केल्याने भरपूर सूर्यप्रकाश व दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे पाल्याची प्रत सुधारते. आंतरमशागत सहज करता येते. पाल्याच्या उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचन करायचे झाल्यास पट्टा पद्धतीत अधिक सोयीचे होते. माती परीक्षणानुसार पिकाला खतमात्रा द्यावी.
संपर्क - 02452- 229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...