जगातल्या १३० पेक्षा अधिक देशात केळीचे एकूण ७.५ दशलक्ष टन उत्पादन घेतले जाते. जागतिक क्रमवारीत केळी उत्पादनात
भारताचा क्रमांक पहिला असून एकूण जागतिक उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. राष्ट्रीयस्तरावर एकूण ५.२0 दशलक्ष टनासह महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तमिळनाडू, गुजरातनंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण उत्पादित केळीचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. एकूण केळी उत्पादनाच्या केवळ ४ ते ५ टक्के केळीवर प्रक्रिया केली जाते. केळी हे एक खूप नाशवंत फळ असून पिकल्यानंतर फक्त ५ ते ६ दिवसांपर्यंत केळी चांगली राहते.
विविधस्तरावर एकूण उत्पादनाच्या २२ ते ३० टक्के काढणीपश्चात नुकसान होते. हे नुकसान दरवर्षी रू.४५ooo कोटीच्या वर होत असते. विकसित आधुनिक केळी उत्पादन तंत्रज्ञान तसेच महाराष्ट्र शासनाकडून केळी उत्पादक शेतक-यांसाठी अनेक सवलती मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील केळीखालील क्षेत्रात तसेच उत्पादनात आणि उत्पादकतेत विक्रमी वाढ झाल्याने बाजारपेठेत केळीची आवक खूप वाढली आहे. मागील वर्षी सदोष बाजारव्यवस्थेमुळे केळी व्यापा-यांकडून शेतक-यांच्या होत असलेल्या पिळवणुकीमुळे केळीचे बाजारभाव रु. १०० ते १५० प्रती किंवटलपर्यंत कोसळल्याचे सर्वज्ञात आहे. अशा परिस्थितीत उत्पादक शेतक-यांच्या गट/समूहांनी तसेच नवीन उद्योजकांनी केळीवर प्रक्रिया उद्योग उभारणे ही काळाची गरज आहे.
केळीवरील प्रक्रियेमुळे फक्त ताज्या केळीचे भाव स्थिर होणार नाहीत तर प्रक्रियायुक्त केळीच्या पदार्थापासून देशांतर्गत तसेच निर्यातीतून चांगले उत्पन्न मिळवता येईल. भारतातील केळी प्रक्रिया उद्योगाच्या स्वरुप तसेच आकाराबाबतीत व्यवस्थित आकडेवारी उपलब्ध नाही तथापि अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या संकेतस्थळावर 'SCOP स्कोप या एका स्वतंत्र संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात एकूण केळी उत्पादनाच्या केवळ o.१ टक्के केळीवर प्रक्रिया केली जाते व यामध्ये प्युरी/ गर (Puree/Pulp), रस (Juice) चिप्प्स आणि भुकटीचा समावेश आहे.
अ.क्र. | पदार्थ | वार्षिक उत्पादित मात्रा (मी.टन) |
---|---|---|
१ | केळी प्युरी /पल्प | ६५००० |
२ | केळी ज्युस | ६००० |
३ | केळी चिप्प्स | २१०० |
४ | केळी भुकटी | ७०० |
तथापि, या सर्वेक्षणातून केळी प्रक्रियेची अद्ययावत स्थिती दिसून येत नाही. |N|BAP संस्थेअंतर्गत राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची NRCB तामिळनाडूकडून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण उत्पादनाच्या २.५ टक्के केळीवर प्रक्रिया होते. सर्वाधिक मात्रा तसेच मूल्यानुसार एकमेव प्रक्रियायुक्त पदार्थ म्हणजे केळी वेफर्स (Chips) होय. वेफर्ससाठी खास उपयुक्त दक्षिण भारतात पिकवल्या जाणा-या पिष्टमय प्लानटीन (Plantain) जातीच्या समूहूगटातील 0.३ दशलक्ष टन केळीचा वापर करून १२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याचे चिप्प्स तयार करण्यात येते. जळगाव जिल्ह्यात एकूण ९३ नोंदणीकृत चिप्प्सचे युनिट आहेत तर ५०० च्या वर विनानोंदणीकृत चिप्प्स युनिटसा कार्यरत आहेत. केळी वेफर्स एकमेव उद्योग असा आहे, ज्यामध्ये सर्वाधिक रोजगार निर्मिती तसेच समाजातील बहुसंख्यांना उदरनिर्वाहासाठी संरक्षण मिळते. प्लानटीन (Plantain) गटातील 'नेंद्रन' (Nendran) ही एकमेव अशी केळीची जात आहे, जी 'चिप्स' च्या माध्यमातून शेतक-यांना उत्पन्न मिळवून देते.
अ.क्र. | क्षमता /टक्केवारी | प्लनटेन | पिकवून केली सेवन | शिजवून केली सेवन |
---|---|---|---|---|
१ |
एकूण उत्पादन (दशलक्ष टन) | १ ते ५ | २५ | १.०० |
२ | राष्ट्रीयस्तरावर ताज्या स्थितीत सेवन (टक्केवारी) | ४५ | ९९ | ६० |
३ | प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री (टक्केवारी) | ५३ | ०.१ |
४० |
या आकडेवारीवरून असे दिसून येईल, की दक्षिण भारतातील राज्यात जिथे 'प्लानटीन' तसे 'कुकींग' जाती समूहाच्या केळीची लागवड केली जाते, तिथे केळीवर प्रक्रिया केली जाते. या विरुद्ध आपल्याकडे पिकवून केळी सेवन जातीच्या (Dessert) समूहातील केळीची लागवड केली जाते. आणि त्यापासून अत्यल्प प्रमाणात प्रक्रिया केली जाते. याचा अर्थ असा नाही, की आपल्या ‘केव्हंडीश जाती' समूहातील केळी प्रक्रियेला उपयुक्त नाहीत.
आपल्या केळीच्या जाती सुध्दा प्रक्रियेसाठी तेवढ्याच उपयुक्त आहेत. तथापि, आपल्याकडे केळी प्रक्रिया उद्योग म्हणून कधीही पाहण्यात आलेला नाही. अतिरिक्त केळी उत्पादनापासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायला आपल्याकडे खूप मोठा वाव आहे. बहुतेक केळी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी खूप खर्चिक मशीनरी आणि अधिक गुर्तवणूकीची गरज नसते. बरचसे केळी प्रक्रिया उद्योग लघुउद्योग म्हणून सुरू करता येतात. यामध्ये सुकेळी (Banana Fig), लोणचे, चटणी यांचा समावेश होतो.
केळी प्रक्रियायुक्त पदार्थाचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते.
अ) पिकलेल्या केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
ब) हिरव्या केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ क) इतर भागापासून प्रक्रियायुक्त पदार्थ
पिकलेल्या केळीच्या गरात विशिष्ट प्रोष्टीयोलायटिक कायक (enzyme) टाकून चांगल्या दर्जाचे रस सेंट्रेिफ्युगेशन (Centifugation) पद्धतीने तयार केले जाते. केळीच्या या रसात जीवनसत्वे तसेच ऊर्जासत्व टाकून पौष्टिक असे पेय तयार केले जाते. या रसाचा वापर ऊर्जा पेय म्हणून केला जातो. हा रस निश्चितपणे काबीनेटेड पेयापेक्षा पौष्टिक आणि स्वस्त असतो.
पिकलेली केळी निवडावी, गर काढावा, त्यात साखर (१० टक्के), पेक्टिन (०.५८ टक्के) तसेच o.३ टक्के सायट्रिक आम्ल व ३00 पीपीएम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट टाकावे. योग्य शिफारशीचा खाद्यरंग टाकून हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून पापडी उलथवावी व पुन्हा १० ते १५ तास सुकवावे. नंतर योग्य आकाराचे तुकडे करून आकर्षक पॅकिंग करावे.
चांगली पक्व झालेली केळी घेऊन त्यांना गरम पाण्याचा
संस्कार (८0 अंश सें.ग्रे, ५ मिनिटे) द्यावा व साल काढ़ावी, 0.५ सें.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात. या चकत्या ७o अंश सें.ग्रे. तापमानात २४ तास किंवा सूर्यप्रकाशात वाळवाव्यात (त्यात किमान ६ ते ८ टक्के आर्द्रता असते) नंतर बारीक दळावे, गाळावे व पॅक करून ठेवावे.
पूर्ण वाढीची/ पक्वतेची केळी घेऊन साल काढावी, योग्य आकाराचे तुकडे करावेत, तेलावर तळावेत व हे तुकडे थंड झाल्यावर पुढील मिश्रणात मिसळून घेऊन बाटलीबंद करावेत. (६०० ग्रॅम केळीच्या तुकड्यांसाठी - ६० ग्रॅम मीठ, मेथी भरडा १८ ग्रॅम, हिंग २ ते ५ ग्रॅम , चटणी २३ - २५ ग्रॅम, मोहरी डाळ - १६ ग्रॅम, हळद - ५ ते ८ ग्रॅम व लसूण पाकळ्या - १८ ते २० ग्रॅम) चवीसाठी लवंग, मिरे, वेलची सुंठ व जिरे यांची प्रत्येकी २ ते ४ ग्रॅम जाडसर भुकटी टाकावी.
नर फुले घ्यावीत, पुंकेसर, पाकळ्याचा भाग काढावा. या फुलांना गरम पाण्याचा संस्कार (८० अंश सें.ग्रे., १५ मिनिट) द्यावा. याचे मिश्रण वाटावे, कढईत मिश्रणाच्या आकाराचे निम्मे तेल गरम करावे. त्यात मोहरी, मिश्रण घालावे. पाणी निघून जाईपर्यंत ढवळावे, व्हिनेगार टाकावे, थंड होऊ द्यावे, बाटलीत भरावे.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 4/5/2021
भारतात ह्या वंशातील एकूण १४ जाती असून त्यांपैकी ३-...
जळगाव जिल्हा हा केळीसाठी समृध्द जिल्हा आहे. येथील ...
केळी’’ म्हटले की, जळगाव, नांदेड जिल्हे आठवतात कोणी...
केळी आणि तृणधान्ये यांचे पोषक मुल्ये यामध्ये दिली ...