অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काकडवर्गीय पिकांचे कीड व्यवस्थापन

काकडवर्गीय पिकांवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषणाऱ्या  किड़ी तसेच  फळमाशी, पाने खाणारे लाल भुगेरे, ठिंपक्याचे भुगेरे, ब्रिस्टल बीटल  आणि लाल कोळी या प्रमुख किंडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो.

रस शोषणा-या किंडी

पानावरील तुडतुड़े

ही किड लहान आणि पाचरीच्या आकाराची असून पूर्ण वाढलेला तुडतुड़ा ३ मेिं मी. लांब आणि 1 मिमी. रुद असतो. तुड़तुड़यांची पिलले तसेच प्रौढ पानाच्या पेशीमधील रस शोशुन घेतात. त्यामुळे पाने पिंवळी पडतात व सुकतात. त्याचप्रमाणे वेलींची वाढ खुंटते. या किंडीच्या व्यवस्थापनेसाठी पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा

ही किड काकडीवर्गीय किांवर नेहमीच आढ्ळून येते. पूर्ण वाढ झालेला मावा आकाराने लांबट असून त्याचा रंग फिंकट तपकिंरीि असतो. या किंडीची पिल्ले तसेच प्रौढ कोवळी पाने तसेच कोवळ्या भागाच्या ग्रंधीत आपली सौंड खुपसून अभ्यास शोधून घेतात, परिणामी पाने आकसतात  आणि पिवळी पङतात. या किंडीच्या पाठीवरील शिंगासारख्या दोन नलिंकांमधून गोड मधासारखा भाग बाहेर पडतो .त्यामुळे पानावर कॅपनोमेडियम नावाच्या काळ्या बुरशीची वाढ  होऊन पाने काळी पङतात. या किंडीच्या व्यवस्थापनेसाठी  शेतात लेडीबर्ड बीटल तसेच क्रायसोपा हे मित्रकीटक अतिशय मोलाचे ठरतात त्यामुळे हे भक्षक मित्रकिंटक शेतात सक्षम प्रमाणात कार्यक्षम असल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा . फारच आवश्यकता भासल्यास मॅलॅथीआॅन ५० टक्के प्रवाही २० मी.ली.अथवा इमीडॅक्लोप्रीड  ४ मिलिं. प्रती दहा लिंट्र पाण्यातून फवारावे.

पांढरी माशी

हि कीड अतिशय लहान म्हणजे अर्धा मी.मी. लांब असते या किडीचे प्रौढ भुरकट पांढऱ्या रंगाचे असून आकाराने अत्यंत लहान असतात . या किडीची पिल्ले तसेच प्रौढ पानातील रस शोषण करतात . त्यामुळे पाने  लहान आकार घेऊन चुरडली जातात. तसेच पांढ-या माशीमुळे विंषाणू रोगाचा प्रसारही होतो. या किंडींची मादी पानाच्या खालच्या भागात अंडी  घालतात.


अंडी दहा दिवसात उबतात. या केिड़ींच्या व्यवस्थापनामातीं चार टक्के निंबोळी अंकांची फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी थायोमीथ्याक्झम  ४ ग्रॅम प्रती १० लिटर  पाण्यातून फवारावे.

फळमाशी

 

 

ही काकडीवर्गीय .पिकावरील प्रमुख किड आहे. फळमाशी लालसर रंगाची असून तिचे धड  पिंवळसरअसते आणि समोरील पंखाच्या टोकावर करड्या रंगाचे ठिपके असतात.मागील पंखाची वाढ फार कमी असते.या किडीची मादी भुंगेरे आपल्या निमुळत्या जनेनद्रियाचा भाग फळाच्या आतमध्ये अंडी घालण्यासाठी टोचत असल्यामुळे फळाच्या वरच्या भागावर झालेली जखम भरून येत असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव बाहेरून सहसा ओळ्खता येत नाही. परंतु अळया, फळाचा आतील भाग खात असल्यामुळे तसेच जिवाणूंना शिंस्कोव होत असल्यामुळे व्रफळे सङतातफ आणि खाली पडतात. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यामध्ये या किंडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. या किंडीची मादी निमुळ्या जननेंद्रियाच्या सहाय्याने फळाच्या आतमध्ये अंडी स्वतंत्र अगर ५ ते १२ च्या समूहात घालते. अंडी दंडगोलाकार भसतात. मादी भट्टी घालण्यासक्ती केलेली जखम भापल्या शरीरातल निकट पदाधनेि भग्न कान्ते. एक मादीं ८० तें ९० अंडी तिच्या 13 ते ५४ दिवसाच्या कालावधीत घालते. अंडी 3 तें ९ दिवसात उबतात.

अंड्यातून निघालेल्या अळ्या फळातील भातील भाग पोखरुन भुयार करतात. अळीची वाढ उन्हाळ्यात तीन दिवसात पूर्ण होते तर हिवाळ्यात तीन आठवड्यापर्यंतचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेली तसेच पाय नसलेली अळी फळातून बाहेर येते आणि जमिनीवर उडी टाकते आणि जमिनीच्या आत २ ते ८ सें.मी. खोलीवर कोशावस्थेत जाते. कोष डब्याच्या आकाराचे फिकट तपकिरी रंगाचे असून ६ ते ९ दिवसात पावसाळ्यात तर ३ ते ४ आठवड्यात हिवाळ्यात त्याचे प्रौढात रूपांतर होते. वर्षाकाठी या किडीच्या अनेक पिढ्या तयार होतात. या किडीच्या व्यवस्थापनेसाठी प्रथम प्रादुर्भावग्रस्त फळे जमा करून त्यांचा अळ्यासहित नाश करावा. झाडाखालील जमीन उकरून काढावी जेणेकरून मातीखालील कोष मारले जातील किंवा पक्षी वेचून खातील. बाजारात उपलब्ध असलेले क्क्यूल्यूरङ्ग चा वापर केलेले गंधसापळे एकरी ५ या प्रमाणात शेतात लावल्यास किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे संशोधनात दिसून आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली. १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाने खाणारे लाल भुगेरे

ही किड देखील काकडीवर्गीय पिकावरील महत्वाची व नुकसान करणारी किड आहे. मोठ्या वेलींपेक्षा ती लहान रोपट्यांचे जास्त नुकसान करते. कारले पीक वगळता इतर काकडीवर्गीय पिकावर आक्रमण करते. या किडीचे नारंगी तसेच गर्द निळ्या रंगाचे मुंगेरे असतात. त्यांचा आकार साधारण लांबट पण चौकोनी असतो. शरीराचा मागचा भाग थोडा निमुळता असतो. लांबी ५ ते ८ मि.मी. असते. हिवाळा संपल्यावर जेव्हा वेलीची नवीन लागवड करतात, त्यावेळी हे भुंगेरे आपल्या सुतावस्थेतून जागे होऊन पिकांवर आक्रमण करतात आणि अधाश्यासारखे पाने कुरतडून खाण्यास सुरू करतात. त्यामुळे पिकाचे फार नुकसान होते. किडीच्या अळ्या रोपटयाच्या मुळांचेही नुकसान करतात. तसेच जमिनीच्या सानिध्यात असलेल्या दांडे, पाने आणि फळे यांचेही नुकसान करतात. अंड्यातून निघालेली अळी पिवळसर पांढरी असते.

अळी ताबडतोब करतात तसेच फळे कुरतडतात. जुन्या वेलीच्या खालील कच-यात किंवा जुन्या वेलींच्या ढिगाच्यात या किडीच्या अवस्था राहतात. किडीच्या अळ्या कात टाकण्यासाठी प्रत्येकवेळी जमिनीत जातात. जमिनीतील ओलाव्यावर या किडीच्या अंड्यांचे भवितव्य अवलंबून असते. विशिष्ट परिस्थितीत उपयोगी नाही. रोपांच्या बुडाजवळ ही कोड जमिनीत अंडी घालते. यासाठी जमिनीचा पृष्ठभाग ओलसर हवा असतो. एक मादी ३00 पर्यंत अंडी घालू पिवळसर आणि लांबट असते. अंडी ६ ते १५ दिवसात उबतात. त्यातून निघालेली अळी पिवळसर पांढरी असते. अळी अवस्था २ ते ३ आठवडे असते. पूर्ण वाढलेली अळी १.२५ सें.मी. पर्यंत खोल जाऊ शकते. तिथे ती स्वत:भोवती मातीचा कोष करून आत शंखी अवस्थेत रूपांतरित होते. ही अवस्था १ ते ३ आठवडे असते. अळी अवस्था २ ते ३ आठवडे असते. एका जीवनक्रमाला ४ ते ८ आठवडे लागतात. प्रतिवर्षी ३ ते ५ पिढ़या तयार होतात.

या किडीच्या अळ्या जमिनीत राहत असल्यामुळे नियंत्रण कठीण होते. ही कोड सकाळी संथ असते तेव्हा पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित पाणी घेऊन त्यात प्रौढ भुगेरे टाकावेत. परसबागेसाठी हा उत्तम उपाय आहे. जुन्या वेली जाळून टाकाव्यात तसेच आवश्यकता भासल्यास मिथील पॅराथीऑन २ टक्के भुकटी रोपट्याच्या बुडाजवळ टाकावी आणि मातीत मिसळून घ्यावी. तसेच काबरीिल ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ४0 ग्रॅम प्रती १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब्रिस्टल बिटल (भुगेरे)

या किडीचे प्रौढ वेलीवरील फुलांच्या पाकळ्या आणि पुंकेसर खातात. त्यामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. प्रौढ मुंगेरे २२ ते २६ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचे असतात. त्यांच्या समोरील पंखावर काळ्या रंगाचे पट्टे असतात आणि दोन पिवळसर रंगाचे पट्टे असतात आणि प्रत्येक दोन पट्ट्यामध्ये एक पिवळसर नारंगी असे तीन आडवे पट्टे असतात. या किडीचे वैशिष्ट्य म्हणजे किडीस स्पर्श करताच ती कोड आपल्या शरीरातून विषारी द्रव्य बाहेर टाकते. त्यामुळे मनुष्याच्या अंगावरील कातडीवर फोड तयार होतो. ही कोड जमिनीत अंडी घालते, अंडी १३ ते १५ दिवसात उबतात. ही कोड शीघ्रपणे इकडून-तिकडे फिरणारी असल्यामुळे तिचे व्यवस्थापन करणे कठीण असते. तरीसुद्धा हे मुंगेरे हातमोजे वापरून हाताने जमा करून त्यांचा नाश केल्यास या किडीची संख्या कमी होऊ शकते. याकरीता अगदी सकाळच्या वेळेस हे मुंगेरे अकार्यक्षम असल्यामुळे त्या काळात ते जमा करणे सोयीस्कर होते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी काबांरील ५0 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ४0 ग्रॅम प्रति १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नागअळी (लिफमायनर)

या किडीच्या अळ्या पानांच्या पापुद्रयात अंडी घालतात. तिथेच अंड्यापासून अळी तयार होते. अळ्या पानांच्या पापुद्रयात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. परिणामी पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी प्रादुर्भाव दिसून येताच ४ टक्के निंबोळी अकांच्या २ ते ३ फवारण्या कराव्यात. पिकावर या अळीचे प्रमाण वाढल्यास अॅबामेक्टीन ४ मि.ली. १0 लीटर पाण्यात मिसळून १ ते २ फवारण्या कराव्यात.

लालकोळी

कोळी लाल किंवा पिवळसर असतो. पानावर ते सैरावैरा धावत असतात. त्यांची लांबी १.१ मि.मी. असल्यामुळे ते डोळ्यांना सहज दिसत नाहीत. ही कोड पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषण करते. त्यामुळे पाने चुरडू लागतात. प्रादुभार्वग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस गळून पडतात. फळांचा आकार लहान व विदूप होतो आणि उत्पन्नात घट होते. मादी साधारणतः ४0 ते ५0 अंडी घालते. त्यातून एक आठवड्यात पिले बाहेर पडतात. मादीप्रमाणे ते झाडाचे शोषण करतात. साधारणत: २ ते ३ आठवड्यात त्यांचे रूपांतर प्रौढ कोळ्यात होते.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रथम कोळी कोडग्रस्त पाने वेलीपासून अलग करून नष्ट करावीत तसेच डायकोफॉल हे कोळीनाशक २0 मि.ली. १0 लीटर पाण्यातून फवारावे.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate