सध्या आंब्याला मोहोर येत असून, पुढील टप्प्यामध्ये आंबा फळ तयार होण्यास सुरवात होईल. या कालावधीत येणाऱ्या किडींपैकी फळमाशी ही महत्त्वाची कीड आहे. आंबा तयार होण्याआधीपासूनच सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशी आटोक्यात ठेवता येईल.
आंबा, चिकू, पपई, सफेद जांबू, जांभूळ, बोर, केळी या फळपिकांवर फळमाशीच्या विविध जाती आढळतात. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात बॅक्ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्ट्रोसेरा करेक्टा व बॅक्ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळून आल्या आहेत, तसेच वेलवर्गीय भाज्या कारली, तोंडली, दोडके, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांवर बॅक्ट्रोसेरा कुकरबीटी ही फळमाशीची जात आढळून आली आहे. या सर्व फळमाश्यांचा सुमारे 25 ते 40 टक्के प्रादुर्भाव होतो.
या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवला जातो. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्या खिडकीतून सापळ्यामध्ये येतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात.
या सापळ्यामध्ये एक प्लायवूडचा ठोकळा ठेवला जातो. फळमाशीला आकर्षित करून मारण्यासाठी या ठोकळ्याला मिथाईल युजेनॉल/ क्युल्युर वापरल्या जातात. तसेच माशीला मारण्यासाठी कीटकनाशकाची प्रक्रिया केलेली असते.
फळमाशीच्या नियंत्रणासाठी बाजारात काही खासगी कंपन्यांचे पिवळे गोल घुमटाकार सापळे उपलब्ध आहेत. रक्षक सापळ्याप्रमाणे यात पाणी टाकावे लागते. सापळ्यात ठेवलेल्या गंधाकडे नर माश्या आकर्षित होऊन सापळ्याच्या गोल भांड्याच्या आतल्या बाजूने आत शिरतात व पाण्यात बुडून मरतात. यातील पाणी वरचेवर बदलावे लागते.
एकदा लावलेला क्युल्युर (गंध गोळी) दोन महिन्यांनी बदलावी.
वरील तिन्ही सापळ्यांमध्ये नर फळमाशी आकर्षित होऊन मरते. सापळे लावलेल्या भागातील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. परिणामी, मिलन प्रक्रियेसाठी नर उपलब्धता कमी होते. मादीची यौनअवस्था ही नरापेक्षा 8 दिवस जास्त असल्याने नराच्या शोधात माद्या अन्य ठिकाणी जातात किंवा अफलित अंडी राहण्याचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे फळमाशी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
वरीलपैकी उपलब्ध सापळे एकरी 4 या प्रमाणात शेतामध्ये 4 ते 5 फूट किंवा पिकाच्या उंचीप्रमाणे शेतात अथवा झाडावर टांगून द्यावेत.
संपर्क - प्रा. उत्तम सहाणे, 8087985890
(कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, ता. डहाणू, जि. ठाणे.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/8/2023
बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरी...
कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...