सर्व वनस्पतींच्या वाढीकरिता अन्नद्रव्यांची गरज असते . पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्याने मातीचे गुणधर्म पाण्याची प्रत आणि वनस्पतीचा प्रकार यावर अवलंबून असते. पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण मुख्यत: केशमुळाद्वारे होते. तर मोठ्या मुळांचा उपयोग झाडाला आधार देण्यासाठी तसेच झाडाने तयार केलेल्या अन्त्राचा आणि पाण्याचा साठा करण्यासाठी होत असतो. पिकांची मुळे काही पदार्थ बाहेर टाकतात. यामुळे मुळांच्या सानिध्यात आलेल्या जमिनीच्या सामूमध्ये बदल घडून येतात. यामुळे अन्नद्रव्याच्या उपलब्धतेमध्ये बदल होत असतो.
पिके निरोगी राहण्यासाठी पिकांना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एखादा जरी अन्नद्रव्य कमी पडला तरी पिकांची वाढ निरोगीपणे होत नाही. अन्नद्रव्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने चार विभागामध्ये केले जाते.
तक्ता क्र. १ : अन्नद्रव्यांचे वर्गीकरण
मुख्य अन्नद्रव्य | कर्ब (C), हायड्रोजन (H), प्राणवायू (O), नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) |
---|---|
दुय्यम मूलद्रव्ये | कॅल्शियम (Ca), मॅग्रेशियम (Mg) व गंधक(S) |
सूक्ष्म अन्नद्रव्य | लोह (Fe), मेंगनीज (Mn), जस्त (Zn), तांबे (Cu), बोरान (B), क्लोरीन |
अन्नमूलद्रव्ये | सिलिकॉन, क्लोरीन, सोडियम व व्हॅनोडियम |
जमिनीतील या अन्नद्रव्यांची उपलब्धता पाहण्यासाठी मातीचे रासायनिक पृथ:करण करणे गरजेचे आहे. माती व पिकांच्या पानाचे, खोडाचे किंवा मुळांचे पृथ:करण करुन अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून अन्नद्रव्यांचे नियोजन व व्यवस्थापन करता येते. या माहितीच्या आधरेि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्याने पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये पुरवली जाऊ शकतात. पिकांना सर्व अन्नद्रव्याचा योग्य पुरवठा होत असेल, सूर्यप्रकाश आणि जमिनीमध्ये योग्य ओलावा असेल तर पिकांची वाढ पूर्णतः होऊन पिके हिरवीगार दिसतात. अन्नद्रव्याच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे : अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे सुरुवातीच्या काळात नवीन येणा-या पानांवर दिसतात. जी अन्नद्रव्ये शोषण केल्यानंतर वनस्पतीमध्ये सहजपणे संचार करतात, अशा अन्नद्रव्याच्या अन्नद्रव्ये शोषण केल्यानंतर नवीन पानांकडे जातात आणि त्यामुळे जुनी पाने अन्नद्रव्यांच्या कतमरतेती लक्षणे दर्शवितात. या उलट ज्या अन्नद्रव्याची वाहकता कमी असते, अशी अन्नद्रव्ये नवीन पानांकडे पोहचू शकत नाहीत, त्यामुळे अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे नवीन येणा-या पानांवर दिसतात.यावरून ढोबळमानाने कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता असेल यांचा अंदाज बांधता येतो. परंतु जर वेळीच अन्नद्रव्य दिली गेली नाहीत तर लक्षणे सर्व पानांवर दिसू लागतात . त्यांची प्रमुख लक्षणे खालील तक्त्यात दिली आहेत.
तक्ता क्र. २ : अन्नद्रव्यांच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे
अ. क्र. | अन्नद्रव्ये | लक्षणे |
---|---|---|
१ | नत्र | नत्राची कमतरता नेहमी जुन्या पानावर दिसते . हरितद्रव्यांचा घटक असल्याने पाने पिवळी पडतात. पानांची संख्या व प्रथिनामध्ये घट होऊन पिकामध्ये वेळेपूर्वीच परिपक्वता येते. पिकाची वाढ खुंटते |
२ |
स्फुरद | याची कमतरता पानांवर दिसून येते. पानांचा रंग जांभळट किंवा लालसर दिसून येतो. सहज बळी पडतात. |
३ | पालाश | पाने पिवळी पडून पानांच्या कडा वेड्यावाकड्या व लालसर होऊन करपतात. खोड अशक्त होऊन जमिनीवर लोळते. रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. फळे लहान व सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. उत्पादन घटते. |
४ | कॅल्शियम |
मुळाची वाढ होत नाही . पानाच्या कडा पिवळ्या पडतात .कोवळी पाने व देठाकडील भाग कमकुवत होतो. अवेळी फुले येतात. फुलोरा गळून पडतो. पाने काळपट दिसतात. फळे अवेळी पिकून वजनात घट येते. |
५ | मॅग्नेशियम | हरितद्रव्य कमी होते. जुन्या पानांवर प्रथम परिणाम होऊन, जुन्या पानांवरील कडांचा रंग फिकट होतो. पानगळ होते. पानांची गुंडाळी होऊन गळतात. |
६ | गंधक | पाने पिवळसर-हिरवी दिसू लागतात. देठ आखूड राहतात. कावळ्या पानावर जास्त परिणाम दिसतो. शेंड्याची कळी वाढत नाही. देठातील ताकद देणा-या कठीण पेशींची वाढ होते व सजीव पेशींचे प्रमाण कमी होऊन अन्नपदार्थाची वाहतूक कमी होते. |
पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा प्रामुख्याने सेंद्रिय आणि असेंद्रिय/ रासायनिक खतांव्दारे केला जातो. रासायनिक खतांमध्ये माजकेच (एक, दोन, तीन) अन्नद्रव्ये असतात. परंतु त्यांचे प्रमाण जास्त असते. सेंद्रिय खते जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये चांगले परिणाम घडवून आणतात. रासायनिक खते महाग असल्यामुळे आणि ती वेळेवर उपलब्ध नसल्याने रासायनिक खतांना पूक सेंद्रिय खतेसुध्दा वापरणे आवश्यक आहे.
रासायनिक खते खरेदी करतांना खतांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकाच्या अवस्था, गरज आणि किंमत यांचा विचार करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये वेगवेगळया प्रकारची सर्वसाधारण खते उपलब्ध असतात. त्यामध्ये २o:२0:0 किंवा १९:१९:१९ असे अंक असतात. हे अंक अन्नद्रव्यांचे खतांमध्ये असलेले शेकडा प्रमाण दर्शवितात. म्हणजे अनुक्रमे २0 टक्के नत्र, २0 टक्के स्फुरद व शुन्य टक्के पालाश किंवा १९ टक्के नत्र, १९ टक्के स्फुरद व १९ टक्के पालाश. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या काही खतांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | नाव | प्रमाण | प्रकार | विद्राव्यता |
---|---|---|---|---|
१ |
अनहायड्रस अमोनिया (कोरडा अमोनिया) | नत्र- ८२ टक्के | वायू | पाण्यात विरघळणारे |
२ | अमोनियाचे द्रावण | नत्र-२२ ते २५ टक्के | द्रव | पाण्यात विरघळणारे |
३ | अमोनियम क्लोराइड | नत्र-२५ ते २६ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
४ | अमोनियम नायट्रेट | ३३ ते ३४ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
५ | अमोनियम सल्फेट | नत्र-२१ टक्के गंधक-२४ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
६ | मोनोअमोनियम फॉस्फेट | नत्र- ११ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
७ | डायअमोनियम फॉस्फेट | नत्र- १८ ते २१ टक्के स्फुरद-४६ ते ५४ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
८ | अमोनियम फॉस्फेट सल्फेट | नत्र- १३ ते २६ टक्के स्फुरद-२0 ते ३९ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
९ | अमोनियम पॉली फॉस्फेट | नत्र-१o ते ११ टक्के स्फुरद– ३४ ते ३७ टक्के | द्रव | पाण्यात विरघळणारे |
१० | अमोनियम बायो सल्फेट | नत्र- १२ टक्के गंधक-२६ टक्के | द्रव | पाण्यात विरघळणारे |
११ | युरिया | नत्र -४६ टक्के | घन | पाण्यात विरघळणारे |
१२ | युरिया सल्फेट | नत्र- ३0 ते ४0 टक्के गंधक- ६ ते ११ टक्के | - | पाण्यात विरघळणारे |
१३ | युरिया अमोनियम नायट्रेट | नत्र- २८ ते ३0 टक्के | द्रव | पाण्यात विरघळणारे |
१४ | युरिया अमोनियम फॉस्फेट | नत्र- २१ ते २८ टक्के स्फुरद- ३0 ते ४२ टक्के | - | पाण्यात विरघळणारे |
१५ | युरिया फॉस्फेट | नत्र- १७ टक्के स्फुरद- ४४ टक्के | - | पाण्यात विरघळणारे |
नायट्रेटयुक्त खते
अ.क्र. | नाव | प्रमाण | विद्राव्यता |
---|---|---|---|
१ | कॅल्शियम नायट्रेट | नत्र -१५ टक्के , चुना - ३४ टक्के | पाण्यात विरघळणारे |
२ | पोटॅशियम नायट्रेट | नत्र १३ टक्के , चुना - ०.५ टक्के , पालाश -०.५ टक्के , म्याग्नेशियम -०.५ टक्के , गंधक - ०.२ टक्के, क्लोरीन -०.२ टक्के | पाण्यात विरघळणारे |
३ | सोडियम नायट्रेट | नत्र - १६ टक्के , क्लोरीन - ०.६ टक्के | पाण्यात विरघळणारे |
क) हळुवार उपलब्ध होणारी नत्र खते
१) गंधकवेष्टीत युरिया , २) सुपर ग्रॅन्युअल खते, ३) नत्र जीवाणू वृद्धी करणारी खते ,४) युरीयेज जीवाणू वृद्धी करणारी खते
स्फुरदयुक्त खते
अ.क्र. | नाव | प्रमाण | विद्राव्यता |
||
---|---|---|---|---|---|
1 |
सिंगल स्फुरद फॉस्फेट | १६ते १८ |
|
||
2 |
ट्रिपल सुपर फॉस्फेट | ४६ ते४८ |
|
||
3 |
डाय सुपर फॉस्फेट | ३२ |
|
सायट्रिक आसीड्युक्त स्फुरद खते
अ. क्र. | नाव | स्फुरदाचे प्रमाण (टक्के) | प्रकार |
---|---|---|---|
१ | बेसिक स्लज | १४ ते १८ | घन |
२ | डाय कॅल्शियम फॉस्फेट | ३४ ते ३९ | घन |
३ | - |
पाण्यात व सायट्रिक अॅसिडमध्ये न विरघळनारी
अ.क्र. | नाव | स्फुरदाचे प्रमाण (टक्के) | प्रकार |
---|---|---|---|
१ | रॉक फॉस्फेट | २० ते ४० | घन |
२ | हाडाची खते | २० ते २५ | घन |
३ | हाडाची वाफेवर तयार केलेली खते | २२ | घन |
इतर स्फुरदयुक्त खते
अ.क्र. | नाव | प्रमाण (टक्के) | विद्राव्यता | |
---|---|---|---|---|
१ | मोनो अमोनिया फॉस्फेट | स्फुरद -३२ नत्र -१२ | पाण्यात विरघळणारे | |
२ | डाय अमोनिया फॉस्फेट | स्फुरद -४६ नत्र -१८ |
|
|
३ | अमोनिया पॉली फॉस्फेट | स्फुरद - ३४ ते ३७ , नत्र - १० ते १५ |
|
|
४ |
नायट्रोफॉस्फेट | स्फुरद - १४ ते २८ , नत्र - १४ ते २८ |
|
|
५ | पोटॅशियम फॉस्फेट | स्फुरद - २२ , पालाश - २९ |
|
खतांचे मुख्यतः दोन भागात वर्गीकरण करता येईल. दाणेदार खते व विद्राव्य खते
दाणेदार खते जमिनीमध्ये दिली जातात. अशी खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. बांगडी पध्दत, खुरी पध्दत, ओळीतून किंवा फोकूनही दिली जातात. खते दिल्याबरोबर ती जमिनीमध्ये मिसळली खतांची उपयोगिता कमी होते. दाणेदार खतामधील काही खते पूर्णतः पाण्यात विद्राव्य असतात. (युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इ.) अशी खते ठिबक संचाव्दारे दिली जातात. परंतु काही खते अविद्राव्य असतात. अशी खते ठिबक सिंचनाद्वारे देऊ नयेत. शिफारस केलेल्या खत मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात खत देऊ नये. जास्तीची खते देण्यापेक्षा कमी खते देणे केव्हाही सोयीस्कर ठरते. खते नेहमी गरम पाण्यामधून दिल्याने खतांची विद्राव्यता वाढते.
विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. सध्या बाजारात प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली अनेक विद्राव्य खते पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विविध ग्रेडसमध्ये उपलब्ध आहेत. विद्राव्य खते घन तसेच द्रवरुप स्वरुपात उपलब्ध आहेत. घन विद्राव्य खते एक किलो व पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार किंमतीमध्ये बदल होत असतो. ही खते पाण्यात १o0 टक्के विरघळतात व आम्लधर्मीय आहेत. विद्राव्य खते ठिबक संचातून तसेच फवारणीसाठी योग्य असतात. काही विद्राव्य खतामध्ये मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये (मॅग्रेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात. विद्राव्य खते प्रामुख्याने पीकांवर फवारणीव्दारे दिल्याने जास्त फायदा होती. कारण ती पीकांना लवकर उपलब्ध होतात.
सध्या शेतीमध्ये रासायनिक खत वापरावर होणारा खर्च वाढत आहे. काही खतांच्या किंमती दुप्पटीपर्यंत तर काही वेळा दुप्पटीहून अधिक वापरावर विशेष भर दिला आहे. साहजिकच विद्राव्य खतांचा वापर वाढला आहे.
प्रवाही सिंचन पध्दतीने पाणी दिल्यामुळे जादा पाण्याचा वापर होतो व पिकाच्या लागवडीचे क्षेत्र आपोआपच कमी होते. खरे म्हणजे कोणत्याही पिकाचा उगवण होण्याचा काळ व त्यानंतर साधारण १५ दिवसापर्यंत पिकास कमी पाण्याची गरज असते. अशा अवस्थेत प्रवाही पध्दतीने हलके नियंत्रित पाणी देणे शक्य होत नाही.
पाणी भरपूर उपलब्ध असले तरी विजेचे लोडशेडिंग इत्यादीमुहे प्रवाही पध्दतीने सर्व क्षेत्र भिजविणे शक्य होत नाही. लागवडीच्या वेळी जमीन कोरडी असते व जमिनीला भेगा पडलेल्या असतात, अशावेळी प्रवाही सिंचन पध्दतीने पाणी दिल्यास पाणी सरीतून पुढे सरकत नाही. कोरड्या जमिनीत बरेचदा भेगामधून पाणी मुळाखाली निघून जाते. तसेच पाण्याचे मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होते.
भिजविण्यासाठी लागणा-या मजूरांच्या उपलब्धतेचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे पिकास खतांची उपलब्धता वाढविण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा व वाफसा असणे अत्यंत आवश्यक असते, जे प्रवाही पध्दतीत सहज शक्य होत नाही. वरील सर्व बाबींमुळे हमखास उत्पादन देणा-या सर्व पिकासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा वापर हा एक उत्तम पर्याय होवू शकतो. प्रवाही सिंचन पध्दतीच्या तुलनेत ठिबक सिंचन पध्दतीचे अनेक फायदे आहेत.
यामध्ये पाण्याच्या बचतीसोबतच अत्यंत नियंत्रित पध्दतीचे झाडांना आवश्यक तेवढे पाणी देता येते. जमिनीत कायम वाफसस्थिती राहून झाडांच्या मुळांना प्राणवायुचा पुरेसा पुरवठा होतो. रात्रीच्या वेळी सिंचन करणे शक्य होते व संपूर्ण क्षेत्रात पाण्याचे समसमान वाटप होते. कमी पाण्यात अधिक क्षेत्र भिजवून जास्त क्षेत्रावर पीक लागवड करता येते व पाण्याव्दारे खतांची मात्रा विभागून देणे शक्य होते.
ठिबक सिंचन संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/आडवी नांगरट व वखराच्या पाळयाव्दारे जमिन भुसभुसीत करावी. भुसभुसीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्यरितीने पसरते. पिकाच्या लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करतांना तडजोड करु नये. संचामध्ये नळयाव्यतिरिक्त फिल्टर, खते देण्याची यंत्रणा व प्रेशर गेज हे महत्वाचे घटक जरुर जोडावेत. ओळीतील प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक तोटीचा वापर केला जातो. ठिंबक तोट्या दोन प्रकारच्या असतात. (इनलाइन व ऑनलाइन) सर्व कमी अंतराच्या पेिकासाठी इनलाइन ठिंबक नळया वापरल्या जातात. इनलाइन नळ्यावर १g ते ७५ सें.मी. इतक्या अंतरावर तोट्या बसविलेल्या असतात. गरजेनुसार नळ्या/लॅटरल (तोट्यासह)ची मागणी विक्रेयाकडे संच बसविण्यापूर्वीच करावी लागते. म्हणजे त्या सहज उपलब्ध होवू शकतात.
ऑनलाइन तोट्या या साध्या लॅटरलवर छिद्रे करून बाहेरून बसविल्या जातात. ऑनलाइन तोट्या पाहिजे त्या अंतरावर बसवेिता येतात. दोन तोट्यामधील अंतर पिकाच्या व जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, पिकाच्या ओळीतील व दोन झाडातील अंतर आणि लागवड पध्दत यानुसार तोट्यामधील अंतर ठरविता येते.
इनलाइन तोट्यातून बाहेर पडणारा प्रवाह साधारण २.२ तें ४.0 लेिटर प्रतेि तास व ऑनलाइन तोटयातून बाहेर पड़णारा प्रवाह साधारण 2.0 ते ८.0 लेिटर प्रतेि तास असतों. वैिजेचीं उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे अधिक प्रवाहाच्या तोट्या उपयुक्त ठरतात. यामुळे संच चालविण्याचा कालावधी कमी होतो. इनलाइन ठिबक नळया पध्दतीत फेिल्टरची निवड जास्त महत्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो. मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फेिल्टर बसविणे आवश्यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कश्चन्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फेिल्टर बसवावा. पाण्यामध्ये शेवाळ व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेले पाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेत.तळयातील पाणी वापरायाचे असल्यास वाळूचा फिल्टर असणे आवश्यक आहे. अन्यथा जाळीचा फेिल्टर वारंवार चोक होवून बंद पडतो व पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे व रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जावून ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याव्दारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसॉयक्लान फेिल्टर वापरावा.
या फिल्टरव्दारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुहे पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेरच्या भिंतीकडे फेकले जावून तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्श्व व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची निवड करावी. या फेिल्टरमध्ये प्लॅस्टीकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यावर बारीक व साधारणपणे वर्तुळाकार खाचा असतात. फेिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यामधील खाचातून स्वच्छ होवून बाहेर पडते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा.जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते. संचामध्ये कमीतकमी दोन प्रेशर गेज असावेत. एक प्रेशर गेज मुख्य पाईपलाईनवर फिल्टरच्या पुर्वी व दुसरा फेिल्टरच्या नंतर बसवावा. याशिवाय खते देण्याची यंत्रणा वापरण्यासाठी गरजेनुसार जास्तीचे प्रेशर गेज बसवावे. संचाच्या आखणीनुसार संच किंती दाबावर चालवावयाचा, फेिल्टर केव्हा स्वच्छ करायचा. व्हेन्चुरींव्दारे खतमिश्रीत पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे. संच योग्य दाबावर सुरु नसल्यास पाण्याचे वितरण समसमान होत नाही व संच चालविण्याचा कालावधी ठरविल्यास त्यात चूका होवू शकतात.
ठिबक सिंचनाचे फायदे पूर्णतः मिळण्यासाठी पिकास आवश्यक असलेली खते ठिंबक संचाद्वारे देणेच जास्त योग्य. सिंचनाच्या पाण्यासोबतच खते देण्याच्या या प्रक्रियेस फर्टिगेशन म्हणतात. ठिंबक सिंचनाद्वारे खते देण्यासाठी खताची टाकी (फर्टिलायझर टॅक), व्हेन्युरी, फटिंलायझर इंजेक्शन पंप व एचटीपी पंप वापरले जातात.
यामध्ये एक स्टीलची/ लोखंडी टाकी फेिल्टरच्या पुर्वी (इनलेटला) जोडलेली असते . या टाकीचे कार्य व रचना सोपी असते . या टाकीमध्ये खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून पाण्याबरोबर दिली जातात. खताच्या टाकीची क्षमता ६० लिटरपासून १oo लिटरपर्यंत असते. फक्त टाकीमधील पाणी उलट प्रवाहाच्या दिशेने विहीर, तलाव, नदी इ. पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळू नये, यासाठी वितरण नळीवर नॉन रिटर्न व्हॉल्व्ह (झडप) बसविणे आवश्यक आहे. फॉंटॅलायझर टॅकद्वारे खते देण्याची पध्दत सर्वात सोपी असली तरी त्यामुळे सर्व झाडांना समप्रमाणात खते दिली जात नाहीत.
व्हेन्च्युरीद्वारे खते देणे ही सर्वात योग्य, कार्यक्षम, लहान, खात्रीशीर व सोपी पध्दत. व्हेन्युरी हे अत्यंत सोपे व योग्य साधन असून सर्वसाधारण शेतक-यांना परवडण्यासारखे आहे. याचा उपयोग खते देण्यासाठी व आम्ल व क्लोरीन प्रक्रिया करण्यासाठीही केला जातो. व्हेन्युरी ही फिल्टरच्या पुर्वी बसवून यामध्ये पाणी देण्याच्या मुख्य पाईपला व्हेन्युरी जोडली जाते. खतमिश्रीत पाण्यात व्हेन्युरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाईपला जोडले जाते. मुख्यपाईपवरील व्हॉल्वच्या सहाय्याने दोन्ही बाजूने पाण्याच्या दाबामध्ये फरक निर्माण केला जातो व खतमिश्रीत पाणी मुख्य प्रवाहात हळूह्ळू सोडता येते. व्हेंचुरीच्या शोषणाचा दर व्हेन्युरींच्या साईजनुसार ३o ते १५og लेिटर प्रती तास एवढा असतो. हा दर पाईपलाइनवर बसविलेल्या व्हॉल्व्ह्द्वारे कमी जास्त करता येतो. व्हेन्चुरीच्या आत जाणारे पाणी व बाहेर येणारे खतमिश्रीत पाणी यांच्या मार्गाजवळ दाब अनुक्रमे १.५ कि.ग्रॅ. आणि 0.७५/१ कि. ग्रॅ. प्रती चौ. सें.मी. असावा. व्हेन्युरी इंजेक्टर हे 0.७५, १.o, १.५ व २.0 इंच साईजमध्ये उपलब्ध असतात. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेंने पिकांना देता येतात.
या प्रकारामध्ये खतांचे द्रावण टाकीत किंवा बादलीत तयार केले जाते व इंजेक्टर पंपाच्या सहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे पेिकांना दिले जाते. सध्या बाजारात या पंपाचे ३ मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्याचा खते शोधून घेण्याचा दर ताशी ४g, १६५ व ४00 लेिटर एवढा आहे. फॉंटॅलायझर इंजेक्टर पपाने पेिकांना योग्य तिव्रतेंचीं व तंतोंतत ख़ते दिली जातात.
शेतक-याकडे उपलब्ध असणारा एचटीपी स्प्रे पंप वापरुन देखील विद्राव्य खते ठिबक सिंचनामधुन देता येतात. यासाठी खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते, पंपाने शोषण करुन ठिबक संचाच्या मुख्य पाणी पाईपमध्ये मिसळण्यात येतात व पिकांना पाण्याबरोबर दिली जातात.
ठिंबक सिंचनाद्वारे पाणी आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वेिद्धान्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतापैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक सिंचनातून द्यावा.
पिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करणे आवश्यक आहे. जमिनीचा सामू विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे व त्यानुसार विद्रव्य खताची मात्रा ठरवावी.
ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्य नसल्यास आठवड्यातून/पंधरवड्यातून एकदा द्यावीत. यामुळे खताची वापर कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.पिकांच्या योग्य वाढ़ीसाठी लागणारी पोषक अक्षद्रव्ये द्रवरूप स्वरूपात (विद्राव्य खते) पिकांच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला फर्टिगेशन अथवा केमिंगेशन म्हणतात.
फर्टिगेशनसाठी वापरल्या जाणा-या विद्राव्य खतामध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक आहे.
विद्राव्य खते बाजारात विविध ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत. गरजेनुसार खताच्या ग्रेड़ची नेिवड़ करुन प्रत्येकर्वेळीं खते देंण्याच्या झाड़ाची संख्या किंवा क्षेत्र व प्रत्येक झाडास द्यावयाची खताची मात्रा यानुसार हवे तेवढे खत एका वेळी संचातून देता येते. युरिया, अमोनिया/ नायट्रेट (३४:0:०). अमोनियम सल्फेट (२१:g:g) कॅल्शियम सल्फेट (१५.५:g:o). मोनोअमोनियम फॉस्फेट, मोनो पोटॅशियम फॉस्फेट (o:५२:३४), युरिया फॉस्फेट (१८:४४:o) पोटॅशियम नायट्रेट (१३:o:४६), पोटॅशियम सल्फेट (g:0:५g), १९:१९:१९, २g:२0:२g इत्यादी अनेक खतांचा समावेश करता येतो. झाडाची प्रत्येक अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असते. याशिवाय पिकाच्या अवस्थेनुसार वेगवेगळे किंवा एकत्रित दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार देता येऊ शकते. विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेडस्र पैिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात.
फर्टिगेशनची कार्यक्षमता खालील बाबींवर अवलंबून असते.
अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर खतांच्या परस्पर संबंधामुळे परिणाम होतो. दोन वेगवेगळी खते मिसळल्यामुळे त्यामधील अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते. बहुतेक कॅल्शियमयुक्त खतांमध्ये इतर खते मिसळू नयेत.
ठिबक सिंचन संचातून विद्राव्य खते देण्याच्या काही मर्यादा आहेत.
ठिबक सिचन संच अधिक कार्यक्षमपणे चालावा, जास्त काळ टिकावा व विद्राव्य खते ही ठिबक सिंचनामधून द्यायची असल्यामुळे संचाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पीक फेरपालटाच्या वेळी हाच संच इतर पिकासाठी वापरता येवू शकतो. ठिबक संचाची मांडणी ही अराखड्यानुसार करावी. विद्राव्य खते शेतामध्ये सर्व ठिकाणी समप्रमाणात दिली जावीत यासाठी खते एकसारखी पाण्यात मिसळली गेली पाहिजेत. पाण्यात साका तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन पाणी व खते समप्रमाणात दिली गेली पाहिजेत. आवश्यकतेनुसार क्लोरीन/आम्ल प्रक्रिया करणे इत्यादी बाबी न चुकता करणे अगत्याचे आहे.
सिंचनाच्या पाण्यातील अशुद्धता काढणे किंवा रासायनिक व जैविक पदार्थामुळे संचातील ड्रीपर्स किंवा लटरल बंद पडत असल्यास क्लोरीन अशुद्धता काढली जाते. संच पुर्ण कार्यक्षमतेने काम करणे, संचातील पाण्याद्वारे आलेले किंवा साचलेले तरंगणारे पदार्थ काढणे, बॅक्टेरियाची वाढ रोखणे, घन पदार्थ विरघळवणे, सेंद्रीय पदार्थाचे विघटन करणे, लोह व मॅग्रेशियमचे क्षार काढणे यासाठी क्लोरीन प्रक्रियेचा वापर होतो.
तर पाण्यातील विरघळलेले क्षार काढणे, पाण्याचा सामु कमी करणे, जास्त असलेले रासायनिक व जैविक पदार्थ काढणे व क्लोरीन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविणे यासाठी आम्ल प्रक्रियेचा वापर केला जातो. क्लोरीन व आम्ल प्रक्रियेसाठी विविध रसायनांचा वापर केला जात असला तरी बाजारात सहज उपलब्ध असलेले हायड्राक्लोरीक आम्ल याचा वापर केल्यास क्लोरीन व आम्ल प्रक्रियेचे ध्येय साध्य होवू शकते. संच विक्रेत्याकडे उपलब्ध असलेले हायड्रोक्लोरीक आम्ल (३५ टक्के अंदाजे १:५ प्रमाणात) पाण्यात द्रावण करुन खते देण्याच्या यंत्रणेद्वारे संचास द्यावे.
ठिबक सिंचन संचातील तोटया व लटरल बंद होण्याचे प्रमाण खुप जास्त असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संचास रासायनिक प्रक्रिया करावी. त्यासाठी रसायनाची तिव्रता, पाण्याचा सामु, प्रक्रिया देण्याचा कालावधी, पाण्यातुन रसायन सोडण्याचा प्रवाह इ. बाबीचा विचार करावा. पाणी व्यवस्थापन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील संशोधन प्रयोगातील निष्कर्षानुसार विविध पीकांकरिता विद्राव्य खतांच्या शिफारशी केलेल्या आहेत. त्याध्ये बीटी कापूस, ऊस, इत्यादी पिकांचा समावेश आहे. अन्य काही पिकांवर विद्राव्य खतांसंबधी प्रयोग सुरु आहेत.
संपर्क क्र. ९४२२१७८0२५
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सेंद्रीय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्ष...
माती परीक्षण अहवालानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
औषधिक्रियाविज्ञान : अन्नद्रव्याखेरीज इतर बाह्य पदा...