অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • सेंद्रीय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.
  • पीक पद्धतीत पहिल्या पिकास वापरलेल्या सेंद्रीय खतांचा वापर पुढील पिकासही उपयुक्त ठरतो.
  • जमिनीच्या भौतिक गुणधर्मात (उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे, पाणी मुरविणे, जमीन भुसभुशीत करणे इत्यादी) सुधारणा होऊन जमिनीस फूल येण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते.
  • जमिनीची जलधारण शक्ती, जैव रासयानिक प्रक्रियांचा समतोल राखला जातो.
  • उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
  • जमिनीतील कर्ब - नत्र यांच्या प्रमाणात समतोल प्रमाणात राखला जातो.
  • योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता विशेषतः नत्राची उपलब्धता वाढविण्यास मदत होते.
  • पीक अवशेषाचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रीय खत म्हणून वापर केल्यास जल व मृदसंधारण तसेच अन्नद्रव्यांचे संधारणही करता येते.
  • जमिनीतील पिकांना पोषक नसणाऱ्या गुणधर्मावर मात करून पीक उत्पादन यशस्वीरीत्या घेता येते. उदा. चुनखडीयुक्त जमिनीत सेंद्रीय खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य दिली असता त्यांची पिकास उपलब्धता वाढते व पीक उत्पादनात वाढ करता येते.
  • सेंद्रीय खतामुळे पिकास सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठाही चांगल्या प्रकारे होतो माती परीक्षणाद्वारे रासायनिक खतांची मात्रा ठरवून त्याबरोबर सेंद्रीय खतांची मात्रा दिल्यास उत्पादनात निश्‍चित वाढ करता येते.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate