पिलांना हा रोग बुरशीमुळे होतो. विशेषतः पावसाळ्यात व आर्द्रता जास्त असलेल्या हवामानात ही बुरशी पक्ष्याच्या शरीरात दूषित हवा, खाद्य, पाणी यांमधून प्रवेश करते.
लक्षणे
श्वासोच्छ्वासास त्रास, जलद श्वसन, खाद्य नकोसे वाटल्यास पिलाचा मृत्यू चोवीस तासांत होतो.
उपाय
शेडची स्वच्छता ठेवावी. स्वच्छ कोरडे खाद्य द्यावे. पिलांना योग्य जागा व स्वच्छ हवा मिळवून मिळावी. लिटर कोरडे ठेवावे. लिव्हर टॉनिक दिल्यास सुधारण्यास मदत होते.
ऍस्परगिलस फ्लाक्स नावाच्या बुरशीपासून तयार झालेले विषारी द्रावण कोंबड्यांच्या खाण्यात आल्यास हा रोग होतो. भिजलेले अगर खराब झालेले खाद्यपदार्थ उदा. - शेंगदाणा पेंड, मका, किडलेला गहू वगैरे धान्यांवर बुरशी तयार होते. असे बुरशीयुक्त खाद्य कोंबडीने खाल्ल्यास तिला विषबाधा होते.
लक्षणे
पिले मलूल होतात, त्यांची पिसे विस्कटतात, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते, वाढ खुंटते, पिले पांगळी होऊन जातात.
उपाय
खराब धान्य खाद्यात वापरू नये, धान्य दमट असल्यास त्यांना कडक उन्हात सुकवावे. संशय आल्यास खाद्य बदलावे व पूरक औषधी म्हणून लिव्हर टॉनिक, जीवनसत्त्वे द्यावीत.
1) ब्रॉयलर पिल्ले लेअर पिल्लांपेक्षा प्रकृतीने नाजूक असतात. त्यांचे खाद्य खाण्याचे व शरीरवाढीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांच्या सहा आठवड्यांच्या थोडक्या काळात बुरशीयुक्त खाद्य खाण्यात आले, तर त्यातील विषारी रसायनामुळे यांच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो.
2) ब्रॉयलर खाद्यात मका, शेंगदाणे पेंड हे खाद्य घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्याच पदार्थांना लवकर बुरशी येते, त्यामुळे चांगले वाळलेले पदार्थ मिळवून त्याचे खाद्य बनवावे.
3) खाद्य बनवत असताना शेंगदाणा पेंडऐवजी सोयाबीन केक व चांगला वाळलेला मका खाद्यासाठी वापरावा. आपण जर कंपनीचे तयार खाद्य घेत असल्यास ते मधून मधून प्रयोगशाळेत तपासावे.
4) कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...