ॲझोला हे हिरवे शेवाळ आहे. यामध्ये वातावरणातील नत्राचे शोषण करून एकत्रीकरण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यात प्रथिने २५-३०%, क्षार १०-१५% आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते.
वाफ्याची जागा झाडाच्या सावलीखाली असावी. वाफ्यावर थेट सूर्यप्रकाश येईल अशी जागा निवडू नये. वाफ्याची जागा समांतर करून घ्यावी. वाफ्याची लांबी साधारणपणे २ मी., रुंदी २ मी. व खोली १०-१५ सेमी ठेवावी.
वाफा निर्मिती
वाफ्याच्या एका कोपऱ्यातून जादा झालेले पाणी निघून जावे याकरिता कोपऱ्याची उंची इतर बाजूपेक्षा २ सेमी कमी ठेवावी. वाफ्यामध्ये तळाशी खराब झालेला प्लॅस्टिकचा कागद अंथरावा. प्लॅस्टिकचा कागद अंथरावा. त्यामुळे परिसरातील झाडांची मुळे वाफ्यात शिरणार नाहीत.
त्यानंतर चांगला झालेला प्लॅस्टिकचा कागद अंथरावा. प्लॅस्टिकचा कागद अंथरावा.
आता तयार केलेल्या वाफ्यात १०-१५ किलो चाळलेली माती या प्लॅस्टिकचा कागदावर समपातळीत पसरावी. दहा लिटर पाण्यामध्ये तीन किलो शेण आणि ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण करून या वाफ्यात चारही बाजूंना ओतावे. त्यानंतर वाफ्यामध्ये दहा सें.मी. उंचीएवढे पाणी ओतावे. हे मिश्रण हाताने थोडे ढवळून काढा व वर आलेला कचरा काढून टाकावा.
१ किलो शुद्ध ॲझोला शेवाळ वाफ्यातील पाण्यात सोडावे. नंतर त्यावर थोडे पाणी शिंपडावे. पाण्याबरोबर ॲझोला वाहून जाऊ नये यासाठी ज्या कोपऱ्यातून पाणी जाते तिथे अशा प्रकारची जाळी लावून घ्यावी.
वाफा झाडाच्या सावलीखाली असेल तर त्यावर प्लास्टिकचे खाली दाखविल्याप्रमाणे आवरण टाकावे.
१५ दिवसांनी या वाफ्यातून ४००-५०० ग्रॅम/दिवस इतका ॲझोला तयार होतो. ॲझोला ची वाढ झपाट्याने होत असते. वाफा पूर्ण भरल्यानंतर आपल्याला १-१.५ किलो/दिवस इतका ॲझोला मिळतो. ॲझोला चाळणीने बाजूला काढून स्वच्छ धुवून घ्यावा व नंतर १:१ याप्रमाणात पेंडीमध्ये मिसळून जनावरांना जनावरांना दिले असता, १०-१२% दुधाचे प्रमाण वाढते तसेच जनावरांची पचन क्षमता वाढते. जनावरांना ॲझोला खुराकासोबत किंवा स्वतंत्रपणेदेखील देता येते. जनावरांना दररोज अर्धा ते १ किलो ॲझोला पेंडीबरोबर देऊ शकतो.
वर चित्रात दाखविल्याप्रमाणे पहिल्या दिवशी १ नंबरच्या वाफ्यातून ॲझोला काढल्यानंतर बरोबर चौथ्या दिवशी १ नंबरच्या वाफ्यातून ॲझोला काढावा.
या वाफ्यात दर आठवड्याला एक किलो शेण आणि २० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे. त्यामुळे ॲझोलाची चांगली वाढ होते.
दर १० दिवसांनी वाफ्यातील अर्धे पाणी काढून टाकावे आणि पाहिल्याइतके ताजे पाणी टाकावे. १.५ ते २ महिन्यांनी वाफ्यातील ५ किलो माती काढून नवीन माती वाफ्यात टाकावे.
सहा महिन्यांतून एकदा पूर्ण वाफ्याची स्वच्छता करून नवीन ॲझोला त्यामध्ये मिसळावा.
ॲझोला हे पशुखाद्य म्हणून गाई, म्हशी, वराह, कोंबड्यांना देता येते. पूर्णपणे पशुखाद्य म्हणून वापर करताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कोंबड्यांच्या नेहमीच्या आहारामध्ये दहा टक्क्यांपर्यंत ॲझोला वनस्पतीचे मिश्रण केल्यास त्यांची उत्पादनक्षमता वाढते. मांसल कोंबड्यांच्या वजनामध्ये झपाट्याने वाढ होते. वराहांच्या नेहमीच्या खाद्यात २० टक्क्यांपर्यंत ॲझोला चा वापर करावा. मत्स्यपालनातही ॲझोला फायदेशीर आहे.
माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड
स्त्रोत:- अग्रीकल्चर नेटवर्क मासिक
अंतिम सुधारित : 10/7/2020
अन्न आणि पोषण बोर्ड निर्मित अर्भक बाळाला आहाराचे म...
पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा ...
सर्व अन्नघटक स्वतःच परिपूर्ण नसतात. पण दोन-तीन अन्...
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स...