1) आडसाली लागवड असलेला को-86032 जातीचा ऊस कारखाना सुरू झाला, की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तोडणी होईल. तोडणीपूर्वी मी 15 दिवस अगोदर पाणी देणे थांबविणार आहे, त्यामुळे उसाची रिकव्हरी चांगली वाढेल. रिकव्हरी चांगली वाढल्याने वजनामध्ये वाढ होईल.
2) सध्या या उसाला एकरी दोन किलो अमोनिअम सल्फेट आणि 250 ग्रॅम पोटॅश ठिबकमधून दररोज देत आहे. अजून सात दिवस ही मात्रा देणार आहे. या खतमात्रेमुळे उसाची वाढ चालू राहते, पोटॅशमुळे रिकव्हरी वाढते.
3) यंदा उसाची वाढ पाहता एकरी 110 टनांपर्यंत उत्पादन मिळले असा अंदाज आहे.
1) सध्या खोडवा ऊस सात महिन्यांचा आहे. सध्या दररोज एकरी अमोनियअम सल्फेट 4 किलो आणि अर्धा किलो पोटॅश ठिबकमधून देत आहे. अजून 15 दिवस ही मात्रा देणार आहे. यामुळे खोडव्याची वाढ चांगली होते, पेरांची लांबी वाढते, काळोखी वाढते. रिकव्हरी चांगली मिळते.
2) खोडव्यात पहिल्यापासून पाचटाचे आच्छादन केले आहे, त्यामुळे पाणी कमी लागते. जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्याचा खोडव्याच्या वाढीस फायदा मिळतो. एक महिन्यानंतर कॅल्शिअम नायट्रेट देणार आहे.
1) नवीन लागवड 15 जुलैची आहे. सध्या पीक अडीच महिन्यांचे झाले आहे. सध्या दररोज युरिया चार किलो , 12ः61ः00 चार किलो, पोटॅश (पांढरे) अर्धा किलो देत आहे. ही मात्रा ऊस पिकाच्या 46 ते 100 दिवसांपर्यंत चालू राहील. जेठा कोंब मोडून बाळ बांधणी झालेली आहे. साधारणपणे 100 दिवसांनंतर मोठी बांधणी करणार आहे.
संपर्क - 9404367518
संजीव माने, आष्टा, जि. सांगली
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...