অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नद्रव्यांची कमतरता

अन्नद्रव्यांची कमतरता

1) नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.

2) स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

3) पालाश - पानाच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

4) जस्त - पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. कळ्या सुरकुतलेल्या असतात. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

5) लोह - लोहाच्या कमतरतेमुळे पानांत पुरेसे हरितद्रव्य तयार होत नाही, त्यामुळे नवीन येणारी कोवळी पाने पिवळसर दिसतात व नंतर पाने गळून पडतात.

6) मॅंगेनीज - पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा, नंतर पांढरट व करडा होतो. कोवळी पाने फिक्कट पिवळसर दिसून येतात.

7) तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात. कणसात किंवा ओंबीत दाणे भरत नाही.

8) बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात. टोमॅटो, डाळिंबामध्ये फळ तडकते.

9) मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात, पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

10) गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.


व्ही. जी. लांबे, साकोली, जि. भंडारा
संपर्क - 0724 - 2258217. विस्तार - 1067 
अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये संशोधन योजना, 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate