देशी वाणापेक्षा बीटी कपाशीवर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळत असून, उत्पादनामध्ये सर्वसाधारण 10 ते 40 टक्के घट येऊ शकते.
विदर्भात कोरडवाहू कापूस पिकावर तुडतुडे (शास्त्रीय नाव - Amrasca beguttula beguttula ) या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटी सुरू होऊन ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा 1 ला पंधरवडा या कालावधीत अधिक प्रमाणात असतो.
अंडी - अंडी वक्राकार, लंबुळकी व पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. एक मादी साधारणतः 15 ते 29 अंडी पानाच्या मध्य शिरेमध्ये घालते. अंडी उबवण्याचा काळ साधारणतः 4 ते 11 दिवसांचा असतो
पिल्ले - पिल्ले पिवळसर हिरव्या रंगाची, पाचरीच्या आकाराची असतात. त्यांची चाल तिरपी असून, पानाच्या खालील बाजूला समूहाने राहतात. पिल्लावस्थेचा कालावधी 7 ते 21 दिवसांचा असून, हा कालावधी हवामानावर अवलंबून असतो. पिल्ले 5 वेळा कात टाकतात.
प्रौढ - प्रौढ 3.5 मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे, फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. समोरच्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो. प्रौढ खूप सक्रिय असून, स्पर्श केल्यास चटकन हवेत उडी मारतात.
सर्वसाधारण एका वर्षामध्ये या किडींच्या 11 जीवनक्रम होतात.
1) प्रतवारी 1 - झाडांवरील संपूर्ण पाने चांगली, न चुरगळलेली.
2) प्रतवारी 2 - मुख्यतः झाडाच्या खालच्या बाजूची अगदी थोडीशी पाने चुरगळलेली, पिवळसर कडा असलेली.
3) प्रतवारी 3 - झाडावरील जवळपास संपूर्ण पाने चुरगडलेली व झाडाची वाढ खुंटलेली.
4) प्रतवारी 4 - झाडावरील संपूर्ण पाने चुरगळलेली, आक्रसलेली, पिवळी, तपकिरी, वाळलेली. पानगळ व झाडाची वाढ एकदम खुंटलेली.
शिफारशीनुसार नियंत्रणाचे नियमित उपाय करूनही आपल्या बीटी कपाशीचे वाण III किंवा IV प्रतवारी गाठत असेल तर पुढील हंगामात हे वाण तुडतुड्यांसाठी संवेदनशील असल्याने वापरू नये.
किमान तापमानात वाढ, अधिक आर्द्रता व ढगाळ वातावरणामध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हमखास वाढतो.
1) किडींचा अखंड अन्नपुरवठा टाळण्यासाठी कपाशीचे पीक हंगामाबाहेर घेण्याचे टाळावे.
2) कापूस पिकाची योग्य फेरपालट करावी.
3) तुडतुड्यांना प्रतिकारक अशा पानावर लव असलेल्या बीटी कपाशीच्या संकरित जातीची निवड करावी.
4) बीटी कपाशीला बियांणाना इमिडाक्लोप्रीड (70 टक्के) किंवा थायामेथोक्झाम (70 टक्के) या कीटकनाशकांची प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे उगवणीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यांपर्यंत संरक्षण मिळते म्हणून या काळात कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी करू नये.
5) मृद परीक्षण करून शिफारशीत खत मात्रेचा वापर करावा. जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा.
6) दोन ओळीतील व दोन झाडांतील अंतर योग्य तेच ठेवावे. कपाशीत चवळीचे आंतरपीक घेतल्यास मित्रकिटकांचे (उदा. लेडी बर्ड बिटल, क्रायसोपा, सिरफीड माशी इ.) पोषण होईल.
7) वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. बांधावरील पर्यायी खाद्य वनस्पती (विशेषतः रान भेंडी) वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात. शक्यतो भेंडीचे पीक कपाशी शेजारी घेऊ नये.
8) ऍझारिडीक्टीन (300 पीपीएम तीव्रता) 30 मिली प्रति 10 लिटर किंवा निंबोळी अर्क (5 टक्के)ची फवारणी करावी.
9) या नंतरही किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी (2-3 पिल्ले/ पान) गाठलीच तर पुढीलपैकी एका शिफारशीत कीटकनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्राध्ये साधारणतः ४० लाख हेक्टर क्षेत्रावर ...
मागील काही वर्षांच्या निरीक्षणातून, डिसेंबरच्या दु...
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...
सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर...