‘आवाज न करणाऱ्या उन्हाळी विजा घातक नसतात’ असा गैरसमजदेखील रूढ आहे. विजांमध्ये सरासरी सुमारे २५ हजार ऍम्पिअरपासून ४० लाख ऍम्पिअरपर्यंतचा विद्युतप्रवाह (करंट) असू शकतो; त्यामुळे गडगडाटाचा आवाज आला नाही, तरी अशी कोसळणारी वीज जीवघेणी ठरू शकते हे वैज्ञानिक सत्य आहे.
‘जास्त जाडीचे बूट घातले म्हणजे वीज पडणार नाही’ हा गैरसमज आहे. विजांमध्ये एवढी ऊर्जा असते, की दगडदेखील वितळून जातात. त्यामुळे जास्त जाडीचे बूट- चप्पल सुरक्षितता देण्यास उपयोगी नसतात.
‘लायटनिंग अरेस्टर लावणे आणि घरात थांबले, की आपण विजांपासून सुरक्षित असतो’ असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र लायटनिंग अरेस्टर योग्य प्रकारे लावलेला आहे, त्याचा सुरक्षा कोन आणि योग्य प्रकारे केलेले वेगळे अर्थिंग यावर आपली सुरक्षितता अवलंबून आहे. आपले घर पत्र्याचे असेल किंवा शेती- मळ्यात सर्वांत उंच असेल, तर ते असुरक्षितच आहे. कारण त्यावर विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते.
मोबाईल विजांना आकर्षित करतात’ हादेखील गैरसमजच आहे. विशेषत: प्रसारमाध्यमांमुळे हा गैरसमज वेगाने पसरला गेला. २००६ मध्ये मुंबई येथे समुद्नकिनारी आपल्या मित्रांचे मोबाईल सांभाळणाऱ्या एका मुलीवर वीज कोसळली. मोकळ्या जागी उभी असल्याने उंची वाढल्यामुळे वीज आकर्षणाने अशी दुर्घटना झाली. सर्वांचे मोबाईल या मुलीकडे होते, हे विजा आकर्षित होण्याचे कारण मुळीच नाही.
व्यावहारीक दृष्टिकोनातून बघितले तर मोबाईलच्या सिग्नल पॉवरपेक्षा, मोबाईल टॉवरवर मोबाईलरेंजसाठी कार्यरत असलेल्या असंख्य मोबाईल ऍन्टिनांची, ‘सिग्नल पॉवर’ हजारोपट जास्त असते. अशा वेळी विजा या सेन्सर ऍन्टिनावर कोसळणे किंवा त्यांची दिशा बदलताना दिसणे तरी आवश्यक आहे; मात्र असे होत नाही. यावरूनदेखील हे सत्य सिद्ध होते की मोबाईल विजांना आकर्षित करीत नाही.
निसर्गचक्रात भेदभाव होत नाही. आकाशातून कोसळणारा प्रचंड विद्युत प्रवाह म्हणजे वीज पडणे किंवा चमकणे होय. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. ‘कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे’ हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वसंरक्षण करणे आणि कोणावर वीज कोसळलीच, तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे.
स्त्रोत-अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये सौराष्ट्र भागात समुद्रकिन...
कृषी पराशर ग्रंथातील पहिल्या 10 श्लोकांत पराशर ऋष...
अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध...
पावसाचे संकेत देणा-या पक्ष्यांविषयी माहिती.