অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टर्की पक्षिपालनाबाबत माहिती

टर्की पक्षिपालनाबाबत माहिती

  1. व्यावसायिक टर्कीपालनासाठी ब्रॉड ब्रेस्टेड ब्रॉंझ, ब्रॉड ब्रेस्टेड व्हाइट आणि बेल्ट्‌सव्हील स्मॉल व्हाइट या जाती उपलब्ध आहेत. यांपैकी भारतातील हवामानाच्या दृष्टीने ब्रॉड ब्रेस्टेड व्हाइट आणि बेल्ट्‌सहील स्मॉल व्हाइट प्रजाती या जास्त उपयुक्त आहेत.
  2. एक दिवसाच्या टर्कीच्या पिलांची एक ते सहा आठवड्यांपर्यंत ब्रुडिंगची व्यवस्था करावी लागते. त्याकरिता गादी पद्धतीचा अवलंब करावा.
  3. कोंबड्यांप्रमाणेच गादी पद्धतीचे घर बांधून पहिल्या चार आठवड्यांपर्यंत प्रतिपक्षी दीड चौ.फू. एवढ्या जागेत दोन इंचांचे गादीमाध्यम पसरून घ्यावे. त्याच्यासभोवती एक फूट उंचीचे कुंपण तयार करावे, की ज्यामुळे छोटी पिले इतस्ततः फिरणार नाहीत. पहिल्या चार आठवड्यांपर्यंत टर्कीच्या पिलांना कृत्रिम उष्णता देण्याची गरज असते. त्यासाठी ब्रुडर अथवा बल्ब आदीचा उपयोग करावा.
  4. टर्की पक्षी हे आकाराने मोठे असल्यामुळे, त्यांना लागणाऱ्या जागेची गरजही कोंबड्यांच्या तुलनेने जास्त असते. खुराडे व कुंपण पद्धतीची घरे या प्रकारामध्ये मोकळ्या जागेभोवती कुंपण घालून पक्ष्यांना सांभाळले जाते.
  5. टर्की ज्या जागेत मोकळे फिरणार आहेत, तिथे जर लुर्सन गवतासारख्या पिकांची लागवड केली, तर हे हिरवे गवत पक्ष्यांना खाण्यासाठी वापरता येते. अशा पद्धतीने नीट वाढ झालेल्या हिरवळीवर टर्की पक्षी चक्राकार पद्धतीने वाढविल्यास पक्ष्यांच्या खाद्यावरील खर्चही जवळ जवळ निम्म्याने कमी होतो.
  6. टर्की पक्षी वयाच्या 24 ते 30 आठवड्यांमध्ये विक्रीयोग्य वजनाचे होतात.

 

संपर्क - 022-24131180, 24137030. 
विस्तारित क्र. 136 
कुक्कुटपालन शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate