राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय बैठका, प्राशिक्षण कालावधीत निवासी सोय व्हावी, राज्यातील स्वंयसहायता बचतगटाच्या वस्तुसांठी विक्रीची सोय व्हावी, या करीता प्लॉट नं.76 अे, सेक्टर-21 खारघर नवी मुंबई येथे ग्रामविकास भवन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्प अंमलबजावणी
- ग्राम विकास भवन प्रकल्पाचे बांधकाम सिडकोमार्फत ठेव अंशदान पध्दतीने कार्यान्वित.
- प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ : 4137.93 चौ.मी. (44,525 चौ.फू.)
- प्रकल्पाची एकूण सुधारीत किंमत : रुपये 35.68 कोटी
प्रकल्पातील सोयी सुविधा
- 475 आसनक्षमतेचे भव्य सभागृह
- 100 प्रक्षिणार्थी क्षमतेचे सर्व सोयींयुक्त्त प्रशिक्षण केंद्र
- सर्व सोयींसुविधांयुक्त 75 निवासी खोल्या
- 100 आसनक्षमतेचे भोजनगृह व स्वयंपाकगृह
- स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी 33 दुकाने
- 50 वाहन क्षमतेचे वाहनतळ
स्त्रोत : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 7/12/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.