अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१ | योजनेचे नाव : | दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत योजना. |
२ | योजने बद्दलचा शासन निर्णय : | शा.नि.क्र. मचिअ-2012/प्र.क्र.141/सां.का.1 दि.30 ऑक्टोबर 2013. |
३ | योजनेचा प्रकार : | अर्थसहाय्याची योजना. |
४ | योजनेचा उद्देश : |
|
५ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : | सर्वांसाठी लागू . |
६ | योजनेच्या प्रमुख अटी : | या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असावे. चित्रपट परिक्षण समितीने परिक्षणाअंती निश्चित केलेला दर्जा अंतिम असेल. कोणत्याही चित्रपटाचे पुन:परिक्षण केले जाणार नाही. अर्थसहाय्यासाठी सादर झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे किमान रुपये 1.00 लाख भाडे शुल्काएवढे चित्रीकरण गोरेगांव चित्रनगरी किंवा कोल्हापूर चित्रनगरी येथे करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्या चित्रपटाच्या अर्थसहाय्यातून रुपये 1.00लाख एवढी कपात केली जाईल. सदर योजनेतील नियमात बदल करणे, सुधारणा करणे किंवा अर्थ लावणे याबाबतचे पूर्ण अधिकार शासनास राहतील. याबाबत शासनाचे आदेश अंतिम आणि संबंधितांवर बंधनकारक राहतील. |
७ | आवश्यक कागदपत्रे : | महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने विहित केलेल्या नमून्यात अर्ज व त्यासोबत चित्रपट कथा, पटकथा, संवादाची प्रत आणि रिळे डिव्हीडीज/डिसीपी (डिजीटल सिनेमा पॅकेज) आणि सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले नफा तोटा व ताळेबंद व इतर संबंधित कागदपत्रे. |
८ | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : | आर्थिक |
९ | अर्ज करण्याची पद्धत : |
|
१० | अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : | निर्मात्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता होण्यास लागणा-या कालावधीवर अवलंबून. |
११ | संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : | महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पश्चिम), मुंबई-65. |
स्रोत : महायोजना, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 11/5/2019
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला प्रवाहात राहून त्या...
राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाकरीता व्...
ज्या जिल्हयात बंदिस्त नाट्यगृह अस्तित्वात नाहीत अश...
आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्...