अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१ | योजनेचे नाव : | आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण |
२ | योजने बद्दलचा शासन निर्णय : | आंचिम-2011/प्र.क्र.158/सां.का.1 दि.18 ऑक्टोबर 2012. |
३ | योजनेचा प्रकार : | अर्थसहाय्याची योजना. |
४ | योजनेचा उद्देश : | आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्राप्त दर्जेदार चित्रपट सामान्य जनतेपर्यंत नेऊन त्यांची अभिरुची वाढविणे. |
५ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : | आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या व शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करणा-या नोदंणीकृत संस्थां. |
६ | योजनेच्या प्रमुख अटी : | अर्थसाहाय्य निधीच्या उपलब्धतेनुसार मंजूर केले जाईल. आयोजन संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे किमान 3 वर्षापूर्वी नोंदणीकृत असावी. संस्थेने लिखित घटना प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील. संस्थेचे मागील 3 वर्षांचे सनदी लेखापालांचे लेखा विषयक अहवाल सादर करणे आवश्यक राहील. आयोजन संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत असावी. लघुपट, माहितीपट, ॲनिमेशनपट तसेच पूर्ण लांबीचे चित्रपट यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच निव्वळ मराठी चित्रपटांचा महोत्सव आयोजित करणा-या संस्थांना सदर अनुदान अनुज्ञेय राहील. आयोजन संस्थेचे उद्दिष्ट हे चित्रपट कलेचा प्रसार, प्रचार, संवर्धन आणि त्यामाध्यमातून कला व संस्कृतिचे प्रदर्शन तसेच ओळख / माहिती करुन देणे असावे. चित्रपट महोत्सवात प्रदान करण्यात प्रदान करण्यात येणा-या पुरस्कार/सन्मान समितीवर शासनाचा किमान एक प्रतिनिधी संस्थेने नेमणे आवश्यक राहील. चित्रपट महोत्सवाची जाहिरात, निमंत्रणपत्रिका इ. माध्यमातून "सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने" असा ठळक उल्लेख करणे आवश्यक आहे. |
७ | आवश्यक कागदपत्रे : | वरील अटींची पुर्तता करत असलेली कागदपत्रे, संस्थेच्या कार्याचा किमान 3 वर्षांचा अहवाल. महोत्सवासंदर्भात छापून आलेल्या जाहिराती, लिखित साहित्य, वृत्तपत्रीय कात्रणे, छायाचित्रे इ. पुरावे सादर करणे आवश्यक राहील. |
८ | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : | प्रथम येणा-यास प्रथम या तत्वावर विहीत निकषांची पुर्तता करणा-या, जास्तीत जास्त 10 संस्थांना प्रत्येकी रपये5.00 लाख याप्रमाणे सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येईल. |
९ | अर्ज करण्याची पद्धत : |
|
१० | अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : | संस्थेकडून आवश्यक त्या सर्व कागपत्रांची पूर्तता होण्यास लागणारा कालावधी यानुसार. |
११ | संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : | संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई |
स्रोत : महायोजना, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 2/23/2020
राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाकरीता व्...
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देणे य...
साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंत...
ज्या जिल्हयात बंदिस्त नाट्यगृह अस्तित्वात नाहीत अश...