कलम ५४ क नुसार
१. ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास जबाबदार असेल. सचिव हा सर्व सभांची कार्यवृत्ते तयार करील. मात्र त्याच्या अनुपस्थितीत सभेत अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळीत असणाऱ्या व्यक्तीकडून याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी अशी कार्य्वृत्तेन तयार करील.
२. पंचायतीचा सचिव सभेची तारीख, वेळ, ठिकाण निश्चित करून १५ दिवसांपेक्षा कमी नसतील इतके दिवस अगोदर ग्रामसभेच्या प्रत्येक सभेची तारीख, वेळ, ठिकाण ग्रामसभेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना व सदस्यांना कळविल.
३. ग्रामसभेने सुत दिली नसेल तर प्रत्येक संबंधित गाव कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा कनिष्ठ अभियंता व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित राहतील.
४. या अधिनियमांत मतदारांच्या यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तिच्या एकूण सभासदसंख्येच्या २५ टक्के किंवा १०० यापैकी संख्या असल्यास गणपूर्ती झाल्याचे समजण्यात येईल. गणपूर्ती शिवाय कोणतीही सभा घेण्यास मुभा दिली जाणार नाही.
५. पंचायत क्षेत्राअंतर्गत एकाहून अधिक ग्रामसभांशी संबंधित कोणत्याही बाबीवर ग्रामसभामध्ये कोणताही विवाद उत्पन्न झाल्यास ग्रामसभांच्या संयुक्त सभेपुढे आणला जाईल आणि अशा संयुक्त सभेत बहुमताने घेतलेला निर्णय हा प्रत्येक ग्रामसभेने घेतलेला निर्णय आहे असे गृहीत धरण्यात येईल.
ग्रामसभेत पुढील विषय घेण्यात यावे.
१. मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.
२. मागील वित्तीय वर्षातील सर्व कामांच्या प्रशासन अहवालाचे वाचन करणे व त्यास मंजुरी देणे.
३. मागील वर्षाच्या जमाखर्चाचे वारंवार वाचन करणे व त्या वार्षिक जमाखर्चास मंजुरी देणे.
४. मागील लेखा परिक्षण अहवालाचे वाचन करणे आणि त्या अहवालातील शंकांना तसेच पूर्वीच्या अहवालातील शंकांना गतवर्षी दिलेल्या उत्तराचे वाचन करणे.
५. मंजूर अंदाजपत्रकाचे वाचन करणे व त्यानुसार चालू वर्षात घ्यावयाचा विकास कामाची माहिती घेणे.
६. चालू वित्तीय वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेणे व पुढील करावयाच्या कामांचा विचार करणे.
७. पंचायत समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचविलेले विषय घेणे.
८. राज्य सरकारने सूचविलेले विषय घेणे.
९. तसेच ग्रामपंचायतीकडे कायदयाने सोपविलेल्या पुढील कामाचे विषय घेणे, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादी मान्यता देणे.
१०. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील सर्व योजनेंची माहिती ग्रामसभेस देणे.
११. दर तीन वर्षांनी ग्रामशिक्षण समितीचे सदस्य निवडणे.
१२. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेकरिता दारिद्रय रेषेखालील लाभार्थींची निवड करणे.
१३.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या समाजकल्याण, महिला बाळ कल्याण विभागाकडे योजनांची सभेत माहिती देणे.
१४. ग्राम कृषी विस्तारक आणि कृषी सहाय्यक यांनी तयार केलेला गावाचा वार्षिक कृषी आराखडा वाचून दाखविणे.
१५. ग्रामविकासाचा वार्षिक कृती आराखडा वाचून दाखविणे.
१६. याशिवाय ग्रामपंचायतीच्या गरजेचे इतर आवश्यक विषय घेणे.
आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेनंतरच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यात अनिवार्य ग्रामसभा घेऊन त्या सभेत पुढील विषय घ्यावेत.
१. पहिल्या सहामाहीतील झालेल्या विकास कामांचा आढावा घेणे.
२. पहिल्या सहामाहीतील जमाखर्चाचा आढावा घेणे.
३. उरलेल्या सहामाहीतील घ्यावयाच्या विकास कामांच्या माहितीचा आढावा घेणे.
ग्रामपंचायतीच्या पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकावर चर्चा करणे.
संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे
अंतिम सुधारित : 6/5/2020
आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केल...
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्रातील [आदिवासी क्ष...