अगदी घरगुती व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यावसायिक घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून कमी भांडवलावर टप्प्या टप्प्याने चांगला व्यवसाय वाढवता येऊ शकतो. त्याचबरोबर थोड्याशा भांडवलावर नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मुद्रा बँक योजना सर्वसामान्य व्यावसायिकांना आधार वाटू लागली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलारसारख्या छोट्याशा गावामध्ये मनीषा भिलारे या गृहिणीने २००० साली घरगुती स्वरुपात कपड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. हा व्यवसाय थोडा-थोडा वाढवत नेला. परंतु, आणखी मोठ्या स्वरुपात वाढविण्यासाठी त्यांना भांडवलाची आवश्यकता होती. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या भिलार शाखेतून मुद्रा बँक योजनेतून दीड लाख रुपयाचे कर्ज घेतले. यातून प्रणिल लेडीज वेअर या नावाने कपड्याचे दुकान सुरु केले. घरगुती असणाऱ्या व्यवसायाचे रुपांतर दुकानाच्या माध्यमातून वाढवले.
या दुकानाच्या माध्यमातून आज त्या खुप चांगला उद्योग करतात. त्यातून त्यांना आर्थिक फायदाही होत आहे. मुद्रा बँक योजनेमुळे मी ही प्रगती करु शकले ही योजना सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी आधार देणारी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमती भिलारे यांनी दिली.
या योजनेच्या यशाबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र भिलार शाखेचे शाखा प्रबंधक राजेंद्र बागडे यांनी माहिती दिली, ते म्हणातात, आमच्या शाखेमार्फत २२ जणांना २८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये शिलाई उद्योग, कापड उद्योग, तयार कपडे, हॉटेल, मंडप व्यावसायिक अशा सर्वसामान्य व्यवसायांचा समावेश आहे. हे सर्व व्यावसायिक उत्तमपणे आपला व्यवसाय करीत आहेत. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या अथवा सद्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रामाणिक आणि पात्र लाभार्थ्यांनी आमच्या शाखेशी संपर्क करावा त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असे आवाहनही श्री.बागडे यांनी केले.
मुद्रा बँक योजनेमुळे सद्या खास करुन गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात चौकशी केली जात आहे. या योजनेमुळे गृहिणींसाठी एक नवे वरदान मिळत आहे. इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि लाभ दिला जाईल, असे अन्नपुर्णा लक्कीबेलकर यांनी सांगितले.
सुशिक्षित बेरोजगारांकडे एखाद्या व्यवसायाचे कौशल्य आहे परंतु भांडवला अभावी ते व्यवसाय करु शकत नाहीत अथवा छोट्या स्वरुपात सुरु केलेला व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अशा गरजू प्रामाणिक लाभार्थ्यांसाठी मुद्रा बँक योजना ही आधार ठरली आहे.
लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/13/2019
संभाव्य अपघात टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न कर...
या विभागात केंद्रीय मत्स्योद्योग संस्थेने विकसित क...
शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमा...
देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या ...