२ लक्ष १४ हजार कुटुंबांकडे शौचालयस्वच्छ. भारत अभियानातंर्गत जिल्ह्याने वैयक्तिक स्वच्छतेबाबत भरारी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध प्रयत्नांमुळे स्वच्छता अभियान जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या अभियानाचा परिणाम म्हणून अनेक नागरिकांनी उघड्यावर जाणे सोडले आहे. गुड मॉर्निंग पथक, टमरेल जप्ती मोहिम, गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी, शौचालयासाठी गृह भेटी आदी विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वैयक्तिक शौचालय बांधकामाचा आलेख झपाट्याने वाढला असून या वर्षांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात 84 हजार 518 वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील 3 लाख 78 हजार 595 एकूण कुटूंबांपैकी 2 लाख 14 हजार 240 कुटूंबांकडे शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. हागणदारीमुक्तीसाठी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनतंर्गत ग्रामीण भागात शौचालयाचे बांधकाम झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जाणीव जागृती झाल्याने जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधकामाचे प्रमाण वाढले आहे. सन 2013-14 ते सन 2016-17 या चार वर्षात 84 हजार 518 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असून 2 लाख 14 हजार 240 कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.
बुलडाणा तालुक्यात 8 हजार 362 वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. तर 21 हजार 427 कुटूंबाकडे आजरोजी शौचालय आहे. चिखली तालुक्यात 8 हजार 816 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व 20 हजार 82 कुटूंबाकडे शौचालय आहेत. देऊळगांव राजा तालुक्यात 4 हजार 601 शौचालयाचे बांधकाम तर 9 हजार 46 कुटूंबाकडे शौचालय आहेत. जळगांव जामोद तालुक्यात 5 हजार 54 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम झाले असून 14 हजार 557 कुटूंबाकडे शौचालय आहेत. खामगांव तालुक्यात 6 हजार 879 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम आहे, तर 21 हजार 163 कुटूंबाकडे शौचालय आहेत. त्याचप्रमाणे लोणार तालुक्यात 4 हजार 796 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व 11 हजार 714 कुटूंबाकडे शौचालय आहेत. मलकापूर तालुक्यामध्ये 8 हजार 673 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम असून 19 हजार 775 कुटूंबाकडे शौचालय आहेत.
मेहकर तालुक्यात वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम 6 हजार 357 झाले, तर 17 हजार 226 कुटूंबाकडे शौचालय आहेत. मोताळा तालुक्यामध्ये 5 हजार 175 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम झाले असून 14 हजार 533 कुटूंबाकडे शौचालय आहेत. तसेच नांदूरा तालुक्यात 6 हजार 876 शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे, तर 16 हजार 554 कुटूंबाकडे शौचालय आहेत. संग्रामपूर तालुक्यात वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम 6 हजार 13 व 16 हजार 575 शौचालये आहेत. शेगांव तालुक्यात 7 हजार 46 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम आहे, तर 16 हजार 497 कुटूंबाकडे शौचालय आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात 15 हजार 91 कुटूंबाकडे शौचालय असून 6 हजार 80 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
शौचालय बांधकामाची जिल्ह्याची टक्केवारी 56.59 टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात शौचालय बांधकामाचा टक्का नक्की वाढला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त शौचालय बांधकामाची 96.40 टक्केवारी मलकापूर तालुक्याची आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम ही जाणीव जागृतीमुळे गती मिळालेली चळवळ आहे. यात शंकाच नाही.
लेखक - निलेश तायडे,
माहिती सहायक,
बुलडाणा
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/8/2019
मोलमजूरी करून उदर निर्वाह करणाऱ्या फुनाबाई पवार या...
3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण 1 लाख...
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर त...