दिवेगाव येथील आम्ही सर्व महिला. सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित आलो व बचतीतून आम्ही आमच्या गरजा भागवू लागलो. बचत करायची, कर्ज घ्यायचे, परतफेड करावयाची, ह्या गोष्टी करता करताच आम्ही महिलांनी विचार केला, की गावातील सर्व गटांमध्ये एकता हवी. यासाठी प्रत्येक गटातील सदस्यांना एकत्रित करून आम्ही संयुक्त महिला समिती तयार केली.
संयुक्त महिला समितीच्या बैठकीमध्ये एक गटाने विचार मांडला, की आम्ही आमच्या गटाच्या सर्व महिला मिळून एक सामुदायिक भाजीपाला बाग तयार करू. त्या दृष्टीने महिलांनी फक्त १ वर्षाकरिताच हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला. जागेचा व पाण्याचा प्रश्न तर होताच, परंतु महिलांनी चर्चा करून ज्या महिलेकडे जमीन होती तिच्या जागेमध्ये भाजीपालाबाग तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या महिलेनेदेखील जमीन व पाणी देण्याची जबाबदारी घेतली. महिलांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला. त्याचप्रमाणे फवारणी खर्च, बी-बियाणे, खत, इत्यादिकारिता लागणारे पैसे त्यांनी कर्ज म्हणून संयुक्त समितीकडून रु. २०००/- घेतले. त्यामुळे त्याचाही प्रश्न सुटला.
तसेच ऋतुमानानुसार कोणत्या भाज्या बागेमध्ये लावायच्या, त्यानुसार वेलवर्गीय, शेंगवर्गीय, पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी सर्व प्रकारच्या भाज्यांची माहिती महिलांनी घेतली.
पावसाळा : जून ते सप्टेंबर – मेथी, पालक, चुका, दोडका, कारली, भोपळा,
मुळा, गाजर.
हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी – गवार, भेंडी, मिरची, टोमाटो, वांगी, वाल,
भोपळा, चवळी, मटार, फुलकोबी.
उन्हाळा : मार्च ते मे – वांगी, काकडी, फुलकोबी, दोडका इत्यादी.
वरीलप्रमाणे भाजीपाला लावण्याचे नियोजन केले. त्यानुसार चांगल्या प्रतीची बी-बियाणे आणून लागवड केली. महिलांनी रोज पाणी घालणे. अधूनमधून खत घालणे इत्यादी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. चांगल्या प्रकारे भाजीपालाबागेची काळजी घेतली व भरपूर भाजीपाला बागेतून पिकू लागला. महिलांनी व गावातील इतर लोकांनी तो भाजीपाला विकत घेतला व उरलेला भाजीपाला त्यांनी बाजारामध्ये नेऊन विकला. ऋतुमानानुसार भाजीपाला लागवड केल्यामुळे वर्षभर त्यांना भाजीपाल्याचे उत्पादन मिळाले. त्याचा फायदा जवळजवळ संयुक्त महिला समितीचे कर्ज फेडून वाहतूक खर्च, फवारणी खर्च, बियाणे, खात इत्यादी सर्व खर्च जा जाता रु. ६,५००/- निव्वळ नफा महिलांना झाला. महिलांना स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटू लागला. लगेचच चांगली भाजीपाल्याची बाग तयार झाली असे नाही, तर त्यासाठी बरेच कष्ट महिलांना घ्यावे लागले. परंतु त्याचे फळ मात्र निश्चितच चांगले मिळाले.
ह्या सामुदायिक उपक्रमामुळे महिला, व्यवहारात शिस्तबद्ध कसे राहायचे, हिशोब कसा ठेवायचा, या सर्व गोष्टी त्यांच्या अनुभवातून शिकल्या.
आज त्यांना ह्या उपक्रमाचा स्वतःला तर अभिमान आहेच, त्याचबरोबर त्यांच्या संयुक्त समितीला देखील अभिमान वाटतो आपणही ह्या प्रकारचा उपक्रम घेऊ शकता. आता आम्ही असे ठरवले, की पडीक जमीन करारावर घेऊन आमच्या सभासदांमध्ये वाटून घेऊ. त्यामुळे आमच्या प्रत्येक सभासदास जमीन पिकवता येईल.
आपल्या गटाच्या देखील सर्व उपक्रमांना आमच्या शुभेच्छा!
|
भाजीपाला खरेदी नोंदी
(तुम्ही खाली दिल्याप्रमाणे हिशोब ठेवण्याची पद्धत कोणत्याही सामुदायिक उपक्रमासाठी वापरू शकता.)
अक्क |
खरेदी दिनांक |
साहित्य |
संख्या |
किंमत रु. |
एकूण रक्कम रु. |
१. |
१०/०७/२००० |
बी-बियाणे, मेथी, पालक |
१/२ किलो |
१५ |
|
२. |
|
|
श्रमदान (गटाने मिळून केलेला उपक्रम)
अ.क्र. |
दिनांक |
व्यक्तीचे नाव |
गटाचे नाव |
केलेले काम |
किती तास |
सही |
१. |
११/७/२००० |
|
|
कुंपण, पाणी घालणे, गवत काढणे |
१/२ तास, १ तास |
भाजीपाला विक्री नोंद
अ.क्र. |
दिनांक |
भाजीपाल्याचे नाव |
किती किलो विक्री (संख्या) |
किंमत रु. |
एकूण रु. |
कुठे विकले |
|
|
|
|
|
|
|
महिन्याचा संक्षिप्त तपशील
अ.क्र. |
महिना |
विक्री किंमत रु. |
एकूण खर्च रु. |
शिल्लक नफा रु. |
१. |
|
|
|
|
२. |
|
|
|
|
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 7/13/2020
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासू...
गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त...
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड...
एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गट...