माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड ऑर्गनायझेशनट्रस्ट चे आभार मानते.आमचा गावात या संस्थेचे सावळे सर आले.त्यांनी आम्हाला महिला बचत गट या विषयी माहिती दिली त्यानंतर आम्ही ११ महिला सभासद एकत्र आलो व आधार महिला बचत गट नावाने गट सुरु केला.या गटात आम्ही दरमहा १००/- रू जमा करतो .माझे छोटेसे कटलरी,गोळ्या बिस्किटाचे दुकान होते व माझ्या पतीचे टेलरिंगचे दुकान होते.
आम्ही गटाचा विचार घेतला व गटाला ICICI बँकेचे १,१०,०००/- रू कर्ज मिळाले.मला वाटले कि आता हे कर्ज घ्यावे व आपले दुकान वाढवावे ह्यासाठी घरर्च्यासोबत चर्चा केली व बचत गटाचा सिरांचे मार्गदर्शन घेतले.यानंतर मी बँकेचे कर्ज १०,०००/- रू व गटातील अंतर्गत कर्ज १०,०००/- रू घेतले.अशा प्रकारे माझा व्यवसायासाठी २०,०००/- रुपयांचे भांडवल तयार केले. मग आम्ही २०,०००/- रुपयांचे साडी व लेडीस ड्रेस मटेरियल विकत आणले .दिवाळी आणि ईदच्या मुहूर्तावर आमचा चांगला माल विकला गेला यातून मला ६,०००/- रुपयांचा नफा झाला.यामुळे मला माझा कुटुंबात मान मिळत आहे . माझे पती देखील त्यांचा व्यवहारात माझा सल्ला घेत आहेत.मी गटातील कर्ज फेडून दुसरे कर्ज घेणार आहे व अजून जास्त माल आणून व्यवसाय मोठा करणार आहे.
खरच मला महिला बचत गट आणि वाटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या आरोग्य प्रकल्पामुळे व मार्गदर्शनामुळे माझ्या संसाराला हाथभार लाभला आहे आणि गटामुळे मोठा आधार मिळाला आहे.
लेखक - शबाना युनिस शेख-शिंगी.
आधार महिला बचत गट.
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासू...
व्यवसाय-संघटनेचा एक प्रकार. औद्योगिक क्रांतीमुळे य...
अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक.
ज्या क्षेत्रातील उदयोगांवर शासन तसेच खाजगी व्यक्ती...