पशुधनाचा विमा म्हणजेच पशूंना होणारे आजार किंवा अपघात यामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी केला जातो (नुकसान भरपाई मिळावी). या दृष्टीकोनातून पशुधन विमा काढणे आजची गरज बनली आहे.
पशू निरोगी आहे, ठराविक वयोगटातील आहे, त्याचे लसीकरण झाले आहे. तसेच पशूचे बाजारातील मूल्य लय आहे. इत्यादी गोष्टींची तपासणी पशूंच्या डॉक्टरांकडून घेऊन नंतरच गायींचा विमा उतरविला जातो.
उदा. गायी, म्हशी खरेदी केल्यानंतर एक आठवड्याच्या आतच गायीचा विमा उतरविला गेला पाहिजे तरच नुकसान भरपाई मिळते. त्याकरीता खालील गोष्टींची पूर्तता करावी लागेल :
अ) विमा कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे.
ब) जनावरांचा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे व गायीचा विमा उतरवणे.
क) गायीचा विमा काढल्यानंतर गायीच्या कानावर खुणेचा बिल्ला लावला जातो.
(बिल्ला लावला म्हणजेच खऱ्या अर्थाने विमा उतरविला गेला आहे असे मानले जाते.) जर गाय, म्हशी, बैल यांच्यामध्ये संपूर्ण कायमची अपंगत्वता ही एक जास्त जोखीम घेता येते. दुभती जन्वारे किंवा उत्पादनाला पूर्णपणे अकार्यक्षम होणे किंवा बैल असल्यास काम करण्यास अपंग होणे हे धोके यामध्ये समाविष्ट आहेत.
पशू |
वयोगट |
वार्षिक प्रिमियम दर |
दुभत्या गायी |
२ ते १० वर्षे |
४.०० % |
दुभत्या म्हशी |
३ ते १२ वर्षे |
४.०० % |
वळू |
३ ते ८ वर्षे |
४.०० % |
बैल |
३ ते १२ वर्षे |
४.०० % |
वरील १ ते ४ साठी (संपूर्ण कायमची अपंगत्वता ही जादा जोखीम घ्यावयाची असल्यास) |
वर्ष |
१.०० % |
बकरी / मेंढी |
४ महिने ते ७ वर्षे |
४.०० % |
टीप : पशुधन विम्याची पॉलिसी पाच वर्षापर्यंत दीर्घ मुदतीसाठी घेता येते.
दुदैवाने जर गाय आजारी होऊन मेली अथवा अपघातामध्ये मेली तर, खालील गोष्टींची खबरदारी घ्यावी.
खालील गोष्टींकरीता नुकसान भरपाई मिळू शकता नाही –
१. पशूला जाणूनबुजून केलेली इजा, जास्त बोजा टाकणे.
२. पॉलिसीच्या मुदतीपूर्वी झालेले आजार किंवा रोग.
३. चोरी किंवा गुप्तपणे विक्री.
अधिक माहितीकरिता जवळच्या विमा कंपनीशी संपर्क साधावा.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 6/30/2020
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार मिळ...
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड...
गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त...
एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गट...