जेव्हा आमचा गावात वाटर संस्थेने काम करण्यास सुरवात केली तेव्हा मी त्यांचा कोणत्याही मीटिंगला प्रशिक्षणाला हजार राहत नव्हतो. आणि या उलट जे माझे मित्र या कार्याक्रमात सहभागी व्हयाचे त्यांना मी चिडवायचो व म्हणायचो कि तुम्हाला काय पैसे मिळतात का? असे प्रश्न करायचो. पण मला नेमही प्रश्न पडायचा कि या प्रशिक्षणात नेमके काय शिकवले जाते. मग मी उज्वलामेडम व ठाकूर सरांना प्रशिक्षण देताना बघितले मग मी तिथे जाऊन बसलो.
संपूर्ण प्रशिक्षण ऐकल्यावर मला वाटले कि हे तर पूर्णपणे आपल्या जीवनाशी संबंधित आहे. आणि मग मी ठरवले कि जेव्हा जेव्हा ह्या संस्थेचा आपल्या गावात उपक्रम असेल शिबीर असेल त्यात सहभाग घ्याचा. मला जेव्हा ह्या संस्थेचा महिला प्रवर्तक घरी बोलवायला यायचा तेव्हा मी त्यांना नाकारायाचो.पण मग मी मेडम व सरांना भेटलो त्यांना घरी बोलावले त्यांचासोबत चर्चा केली तेव्हा तर प्रकर्षाने जाणवले कि हे लोक हि वॉटर संस्थेचा फक्त समाज सेवा करत आहेत.यांना गावाला आदर्श गाव बाण्याचे आह.
जर संस्थेला गावची काळजी वाटत असेल तर मग मी तर गावाचाच आहे मग मी का त्यांना मदत करू नये असे वाटले आणि मी देखील सर्व उपक्रमांसाठी मदत करू लागलो लोकांना बोलवू लागलो. काही दिवसानंतर मला गावातील आरोग्य सामितीचा अध्यक्ष बनविले.तेव्हा मला खूप आनंद झाला व मी त्यावरच न थांबता माझी बायको जिला मी कधीही घराबाहेर पडू दिले नाही तिला महिला प्रवर्तक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.तसेच तिला कुटुंबातून देखील कोणतेही अडचण येणार नाही याची काळजी घेतो.मी माझा आईला देखील सांगिलते आहे कि माझा बायकोला गावातील कामासाठी अडवू नकोस.अगोदर माझी बायको मला भीत होती.पण आता दोघे एकमेकान सोबत विचार विनिमय करतो, भावभावना व्यक्त करतो.
माझा घरच्यांनी माझे लग्न एका मुलीसोबत लावून दिले,मात्र या संस्थेचा प्रकल्पामुळे मला त्यामुलीतील व्यक्तित्व व तिचे अस्तित्व कळाले व खर्या अर्थाने मला माझी पत्नी जीवनसाथी काळाली आणि मिळाली.आता माझा व कुटुंबाच्या सर्व अडचणींवर चांगल्या पद्धतीने आम्हाला मात करता येत आहे.आम्ही दोघेत्या अडचणी सहज सोडवत आहोत. आता मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. तसेच गावात होणार्या आरोग्य विषयक बदलानबाबत आनंद वाटतो. या सर्व गोष्टींचे श्रेय मी वाटर संस्थेला देतो. धन्यवाद वॉटर संस्था !
लेखक - योगेश नानासाहेब सुकासे
संजरपूर
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 3/8/2024
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी र...
या विभागात गरोदरपणात महिलांनी कोणती कामे करावीत आण...
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व ...