शेतात पिकणाऱ्या शेतमालाची विक्री झाल्या नंतर पुढील पेरणी करिता शेत रिकामे करणे आणि या प्रक्रियेतून निघणारा कचरा व टाकाऊ मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न नेहमीच शेतकरी बांधवा समोर उभा ठाकतो. अशा परिस्थितीत हा कचरा जाळला तरी जातो किंवा याला शेतीच्या बांधलगत तसल्या स्थितीतच फेकून दिले जाते. या कच-याचे प्रमाण प्रचंड असल्याने, याच्या जाळण्याने जे प्रदूषण होते त्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते.
मात्र हा निरुपयोगी कचराच आता शेतकरी बांधवाना एका नवीन उद्योगाची वाट खुणावत आहे.शेतात निर्माण झालेल्या अवशिष्ट पदार्थांपासून उदाहरणार्थ घन कचरा, पाला पाचोळा, सुका कचरा कापसाच्या काड्या, तुरीच्या तुराट्या, मक्याची बिट्टी, इत्यादी, यांस पासून जैव-इंधनाची निर्मित करण्याचा एक उत्तम पर्याय म्हणून 'इको पेलेट मेकर' चा वापर होऊ शकतो. इंधनाच्या आणि उर्जेच्या तुटवड्याने आज संपूर्ण भारत होरपळलेला आहे. इको पेलेट मेकर वापरून तयार होणाऱ्या जैव-इंधनास "बायोमास पेलेट फ्युएल" किंवा "फ्युएल पेलेट" म्हणूनही ओळखले जाते.
बायोमास पेलेट फ्युएल हे एक उच्च प्रतीचे इंधन असून, औद्योगिक क्षेत्रात बायोमास पेलेट फ्युएलचा उपयोग झपाट्याने वाढतो आहे. तसेच अनेक भागांमध्ये अन्न शिजवण्यास खास बनवलेल्या "निर्धूर चूली" मध्ये जाळण्यास या पेलेट चा उपयोग इंधन म्हणून केला जातो. या चुली फक्त धूरविरहित नसून या चुलींवर शिजवलेले अन्न हे अधिक रुचकर लागते आणि याचा खर्च हा एलपीजी ( LPG ) सिलेंडर पेक्षा २५% ने कमी असतो.
कमी पर्जन्य आणि शेतमालाला मिळणारा कमी हमीभाव यामुळे हवालदिल झालेला शेतकरी, गाव सोडून शाहाराची वाट धरण्यास प्रवृत्त होत आहे. अश्या या भूमिपुत्रांना आणि औद्योगिक क्षेत्राला जोडणारा दुवा म्हणून इको पेलेट मेकर हा एक योग्य पर्याय होऊ शकतो. सामाजिक जाणीवेतून श्री गणेश ग्रूप (औरंगाबाद) यांनी निर्माण केलेले हे यंत्र शेतकरी बांधवाना जोड धंदा निर्माण करून देण्याची एक चांगली संधी होऊ पाहत आहे. या प्रकारे चौफेर उपयोगिता असणारे हे इंधन, औद्योगिक तसेच घरगुती इंधन म्हणून वापरता येते. बायोमास पेलेट ची विक्री करून शेतकरी बांधवांस एक नवीन जोड-धंदा मिळण्यास मदत होऊ शकते.
हे इंधन सामान्य मोकळ्या स्थितीत असलेल्या टाकाऊ कचऱ्यापेक्षा जास्त वेळ जळते आणि जास्त उष्मा निर्माण करते. तसेच या इंधनामुळे प्रदूषण होत नाही, ज्या मूळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबण्यास मदत होते. अश्या या अत्यंत उपयोगी आणि स्वच्छ इंधनाचा पुरवठा औद्योगिक क्षेत्रात बॉयलर चे इंधन म्हणून करता येतो, तसेच निर्धूर चुलीचे इंधन म्हणून सुद्धा यास चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे.
इको पेलेट मेकर मशीन आणि इको श्रेडर मशीन यांचा एकत्रित खर्च हा तीन लाख सत्तर हजार रुपये इतका येतो. हि मशीन घेणाऱ्यास, हि मशीन चालवण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते सोबतच पेलेट बनवण्याचा विविध पद्धतींची सुद्धा सखोल माहिती दिली जाते. अधिक माहिती साठी ०२४०-२२४४११२ / ९९२११०००४४ /९५५२५३३१३२ या क्रमांकावर संपर्क करावा.
माहिती संकलन - प्रतिक डुबे
अंतिम सुधारित : 1/30/2020
गुजरातमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक, वृत्तपत्रसंपादक...
लेनिन, न्यिकलाय : (२२ एप्रिल १८७०-२१ जानेवारी १९२४...
MPOS म्हणजे Mobile Point of Sale मशीन. हि मशीन आपण...
सुतारकामास