অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूळजी करसनदास

मूळजी करसनदास

मूळजी करसनदास : गुजरातमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक, वृत्तपत्रसंपादक आणि ‘गुजराती ज्ञानप्रसारक मंडळी’ व ‘बुद्धिवर्धक सभा’ या संस्थांचे कार्यकारी सभासद. या संस्थांमार्फत होणार्‍या चर्चासत्रांत परदेशगमन, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, सार्वत्रिक शिक्षण इ. विषयांचा प्रामुख्याने अंतर्भाव असे. लोकजागृतीच्या उद्देशाने ते रास्तगोफ्तार नावाच्या पत्रातही लिहीत असत; परंतु हिंदू समाजातील अनेकविध दोषांसंबंधी आपले मते परखडपणे मांडता यावीत; म्हणून त्यांनी सत्यप्रकाश हे स्वतःचे पत्र चालविले (१८५५ - ९०). वल्लभसंप्रदायाचे महाराज व ब्राह्मण यांच्यातील वादातही त्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि जातिबहिष्काराला न जुमानता आपली सुधारणावादी विचारसरणी अंमलात आणली. राजकोट व लिमडी या दोन संस्थानांचा कारभार करण्याची ब्रिटिश सरकारतर्फे त्यांना संधी मिळाली; तेव्हा त्यांनी एक कार्यक्षम प्रशासक म्हणून लौकिक संपादन केला. मागासवर्गीयांची स्थिती सुधरण्यासाठीही त्यांनी अव्याहत श्रम केले. त्यांचे इंग्लंडमां प्रवास, महाराज लायबल केसनो हेवाल इ. गुजराती ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

 

लेखक - विमल गोखले

स्त्रोत - मराठी विश्वकोश

https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/khand3-suchi?id=5858

अंतिम सुधारित : 8/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate