( हा दिवस २६ मार्च किंवा मार्च महिन्याचा शेवटचा शनिवार या दिवशी साजरा करतात. )
रामसेतू बांधायला आपल्या परीने मदत करणा-या खारीने माझ्या मुठभर वाळूने काय होणार? असा विचार केला नाही ! याचप्रमाणे गरज नसलेले दिवे एक तास बंद ठेवल्याने कित्येक दशलक्ष युनिट्स वीज वाचते एकाच उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांनी एकादिलाने केलेला प्रयत्न यशस्वी होण्याचे हे एक उदाहरण आहे!
अर्थ अवर ही सिंगापूरमधून चालवली जणारी धर्मादायी संस्था आहे व तिच्या कार्याला वाईल्डलाईफ फंडाचे सहकार्य आहे. या संस्थेने २००८ साली प्रथम केलेल्या एक तास दिवे बंद या आवाहनाला जगभरातून प्रतिसाद मिळाला व तो दरवर्षी वाढतो आहे.
या कृतीने जगभराच्या एक दिवसाच्या वीजवापरात ५ ते १५ टक्के बचत होते असे आढळते- उदा दुबईत १०० मेगावॅट अवर वाचले; तर महाराष्ट्रातील अमरावती वीज – विभागात ७.५० लाख युनिट्स वीज वाचली. या मोहिमेत भाग घेण्याचा दुसरा अर्थ असा की हवामानातील बदल, तापमानवाढ यांमागील कारणांना विरोध दाखवणे. यांसारख्या पर्यावरणाला धोकादायक बाबींमध्ये मानवाच्या आधुनिक चंगळवादी जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. हे सिद्ध झाले आहे. आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी केलेले हे एक प्रकारचे मतदानच आहे !
नेहमीच अनावश्यक दिवे, पंखे बंद करा आणि तसे करण्यास इतरांनाही प्रवृत्त करा.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 3/31/2020
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ द...
वनराई आणि जिल्हा कृषी विभाग, रत्नागिरी यांच्या संय...
हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग याबाबत प्रबोधन ...