वनराई आणि जिल्हा कृषी विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख तालुक्यातील 250 जणांची ओसरगाव (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे नुकतीच अभ्यास सहल पार पडली. एकूण पाच गावातील पाणलोट समित्यांच्या कक्षेतील शेतकरी, महिला बचत गट, उपभोक्ता गट, पाणलोट समिती सदस्य, ग्रामीण युवक व युवती इत्यादी या सहलींमध्ये सहभागी झाले होते.
‘वसुंधरा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमा’तील ‘उपजीविका उपक्रमा’अंतर्गत ही अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत ‘वसुंधरा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम’ हा प्रकल्प राज्य शासनांद्वारे देशपातळीवर राबविण्यात येत आहे.
कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात वनराईमार्फत या प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ‘उपजीविका उपक्रम’ राबविला जात असून, या उपक्रमाअंतर्गत पाणलोट समित्याच्या स्वरूपात शेतकर्यांचे गट तयार केले जातात.
या गटांमधील प्रत्येक सदस्याला उपजीविकेचे साधन निर्माण होऊ शकेल असे प्रकल्प राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून संगमेश्वर (देवरूख) तालुक्यातील पाच गावांतील पाणलोट समित्यांच्या 250 सदस्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये साडवली, पूर किरदाडी, कोंडेकदमभूजबळ, वार्शी तर्फ देवरूख आणि करली/देवघर या गावांचा समावेश होता.
या अभ्यास सहलीच्या माध्यमातून ओसरगाव (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील कोकण महिला विकास कंपनीस भेट देण्यात आली. या भेटीमध्ये कंपनीमार्फत चालविले जाणारे विविध लघुउद्योग पाहण्यात आले.
आवळा पेढा निर्मिती केंद्र, नाचणी पापड निर्मिती उद्योग, विविध प्रकारचे ज्यूस, आंबा, सुपारी, काजू प्रक्रिया उद्योग अशा विविध लघुउद्योगांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, तसेच महिलांना हे उद्योग कसे करता येतील, त्यासाठी कोणकोणती सामग्री लागेल, भांडवल किती गुंतवावे लागेल अशा विविध बाबींची माहिती या अभ्यास सहलीतील सहभागी शेतकर्यांनी व बचत गटांच्या महिला सदस्यांनी घेतली.
ही अभ्यास सहल यशस्वी होण्यासाठी वनराईचे प्रकल्प उपसंचालक चंद्रकांत चव्हाण, प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वर सरडे, दीपाली गुडेकर, शर्मिला गुरव, दर्शना सावंत, शिल्पा शिर्के आदींनी परिश्रम घेतले.
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 8/20/2020
वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ द...
हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग याबाबत प्रबोधन ...
या विभागात भू-संसाधन विभाग, भारत सरकार, वसुंधरा ...
पृथ्वीच्या संरक्षणासाठी जागतिक वसुंधरा घटिका दिन ...