मीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द
मीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द : (९ मार्च १७४९–२ एप्रिल १७९१). फ्रेंच राज्यक्रांतीकालातील एक प्रभावी वक्ता आणि मुत्सद्दी. जन्म फ्रान्समधील एका सुप्रतिष्ठित सरदार घराण्यात ओमनॉन (नेमर्सजवळ) या गावी. मीराबोचे बालपण आजार (देवीचा रोग) आणि उडाणटप्पूपणात गेले. त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण राहिल्यामुळे त्याला कुरूपता प्राप्त झाली.