औषधिकोश
औषधिकोश : औषधिद्रव्यांचे गुणधर्म, शक्ती, विशुद्धी व त्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या औषधांची माहिती देणाऱ्या,सामान्यतः शासनामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथाला औषधिकोश असे म्हणतात. औषधी प्रत्यक्ष व्यवहारात काही काळ वापरल्यानंतरच त्यांचा समावेश या अधिकृत ग्रंथात करण्यात येतो.