एल् साल्वादोर
एल् साल्वादोर : मध्य अमेरिकेतील सर्वांत छोटा व सर्वांत दाट वस्तीचा देश. क्षेत्रफळ २१,३९३ चौ. किमी.; लोकसंख्या ३५,८७,९१७ (१९७१). याच्या उत्तरेस व पूर्वेस हाँडुरस, वायव्येस ग्वातेमाला आणि दक्षिणेस व पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. अटलांटिक महासागरावर किनारा नसलेला हा मध्य अमेरिकेतील एकमेव देश असून याची राजधानी सान साल्वादोर ही आहे.