गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. त्यात साध्या (म्हणजे कर्करोग नसलेल्या) गाठी आणि कर्करोगाच्या गाठी हे प्रमुख प्रकार आहेत. साध्या गाठी गर्भाशयाच्या आजूबाजूला पसरत नाहीत. वेळी-अवेळी होणारा रक्तस्राव हेच याचे प्रमुख लक्षण असते. कर्करोगाच्या गाठी असल्या तरी हेच लक्षण असते. साधी गाठ मोठी असेल तर हाताला ओटीपोटात 'गोळा'लागतो. या गोळयाचा आकार लहानमोठया कवठाइतकाही होऊ शकतो. कर्करोग असेल तर मात्र गोळा फार वाढायच्या आतच रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कर्करोगाची बाकीची लक्षणे महत्त्वाची असतात. यात भूक, वजन कमी होणे,रक्तपांढरी ही लक्षणे विशेष असतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
गर्भाशयातून ठराविक काळानंतर योनिमार्गे जो रक्तस्रा...
प्रसवोत्तर परिचर्या : प्रसवोत्तर काळात म्हणजे प्रस...
या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपा...
गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्र...