प्रकार
|
उदाहरणे
|
होणारा त्रास
|
ऍंटिऍँक्झायटी (अस्थिर-चित्तरोधक) औषध
|
डायझेपाम (उर्फ - डाएस्टॅटव्हॅलिअम)
|
हे औषध गर्भावस्थेमध्ये उशीराच्या दिवसांत घेतल्यास बाळामध्ये चिडचिड, खिन्नता, थरथर किंवा उच्चवेगीय प्रतिक्षिप्त क्रिया (exaggerated reflexes) इ. लक्षणे दिसतात.
|
प्रतिजैविके
|
क्लोरमफेनिकॉल (क्लोरांफेनिकॉल)
|
ग्लुकोज-6-फॉस्फेट डीहायड्रोजेनासी (G6PD) कमतरता असणार्याट स्त्री किंवा बाळात ग्रे बेबी सिंड्रोम (लाल रक्तपेशींचे विघटन)
|
|
फ्लुरोक्विनोलोन्स - उदा. सिप्रोफ्लोक्झासिन (सायलोझांसिप्रो), ओफ्लोक्झासिन (फ्लॉक्सिनोक्युफ्लॉक्स), लिव्होफ्लोक्झासिन (लिव्हाक्विनक्विक्झिन) आणि नॉरफ्लोक्झासिन (नोरोक्झिन)
|
सांध्यांमधील अनियमितता (फक्त प्राण्यांमध्येच आढळते)
|
|
कानामायसिन
|
गर्भाच्या कानाचे नुकसान (होणारे मूल बहिरे असू शकते)
|
|
नायट्रोफ्युरेंटाइन (फ्युराडेंटिनमॅक्रोडेंटिन)
|
ग्लुकोज-6-फॉस्फेट डीहायड्रोजेनासी (G6PD) कमतरता असणार्याट स्त्री किंवा बाळात ग्रे बेबी सिंड्रोम (लाल रक्तपेशींचे विघटन)
|
|
स्ट्रेप्टोमायसिन
|
गर्भाच्या कानाचे नुकसान (होणारे मूल बहिरे असू शकते)
|
|
गर्भाच्या कानाचे नुकसान (होणारे मूल बहिरे असू शकते)
|
गर्भावस्थेच्या उशीराच्या दिवसांत दिल्यास होणार्याय बाळास कावीळ अथवा मेंदूचा विकार असू शकतो
|
|
टेट्रासायक्लिन (सुमायसिन)
|
हाडांची वाढ मंदपणे होणे, दात कायमचेच पिवळे होणे, बाळाच्या शरीरावर खळगे (कॅव्हिटीज) निर्माण होण्याची शक्यता जास्त कधीकधी गर्भवतीचे यकृत बंद पडणे(लिव्हर फेल्युअर)
|
रक्त साकळणे-विरोधक (ऍंटिकॉग्युलंट्स)
|
हिपारिन
|
हे औषध दीर्घकाळ घेतल्यास गर्भवतींमध्ये ओस्टिओपोरॅसिस (हाडे ठिसूळ होणे) आणि प्लेटलेट्सची संख्या घटणे (प्लेटलेट्स रक्त साकळण्यात मदत करतात)
|
|
वार्फारिन (कौमाडिन)
|
जन्मजात दोष; गर्भवती तसेच गर्भात रक्त वाहणे
|
आकडी-रोधक (ऍँटिकन्व्हल्जंट्स)
|
कार्बामाझेपाइन (टेग्रेटॉल)
|
जन्मजात दोषांची शक्यता. नवजातांमध्ये रक्त वाहण्याची शक्यता, परंतु गर्भवतींनी, जन्म देण्यापूर्वी, एक महिन्यासाठी दररोज तोंडावाटे के जीवनसत्व घेतल्यास किंवा बाळाला जन्मानंतर लगेच के जीवनसत्वाचे इंजेक्शन दिल्यास हे टाळता येते.
|
|
फेनोबार्बिटाल(ल्युमिनाल)
|
कार्बामाझेपाइनसाठीच्या लक्षणांप्रमाणेच
|
|
फेनिटॉइन (डायलँटिन)
|
कार्बामाझेपाइनसाठीच्या लक्षणांप्रमाणेच
|
|
ट्रायमेथाडिओन (ट्रायडायोन)
|
गर्भपाताचा धोका अधिक जन्मजात विकृतींची शक्यता जास्त (70% पर्यंत) – क्लेफ्ट पॅलेट (टाळू वाकडी असणे) अथवा हृदय, चेहरा, कवटी, हात किंवा पोटातील अवयवांच्या बाबतीत
|
|
व्हालप्रोट (डिपॅकॉन)
|
जन्मजात व्यंगाची किंचित शक्यता (1%) क्लेफ्ट पॅलेट (टाळू वाकडी असणे) अथवा हृदय, चेहरा, कवटी, हातपाय किंवा पाठीच्या कण्याच्या बाबतीत
|
ऍँटिहायपरटेन्सिव्ह्ज्
|
ऍँडिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एंझाइम (ACE) रोधक
|
ही औषधे गर्भावस्थेच्या काळात उशीराने घेतल्यास गर्भाच्या मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते, वाढत्या गर्भ द्रवाची (ऍम्नियॉटिक फ्लुइड) पातळी कमी होऊ शकते तसेच चेहरा, हातपाय आणि फुफ्फुसांचे विकार असू शकतात
|
|
बीटा-ब्लॉकर्स
|
गर्भारपणी घेतलेल्या काही बीटा-ब्लॉकर्समुळे गर्भाच्या दृदयाच्या स्पंदनाचा वेग कमी होऊ शकतो, त्याच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते आणि एकंदर वाढ मंद होते
|
|
थायाझाइड डाययुरेक्टिक्स
|
गर्भाच्या रक्तातील प्लेटलेट्स तसेच ऑक्सिजन, सोडिअम, पोटॅशिअमच्या प्रमाणात घट. वाढ मंदावणे
|
केमोथेरेपी औषधे
|
ऍक्शनोमायसिन
|
जन्मजात व्यंगांची शक्यता (फक्त प्राण्यांमध्येच आढळली आहे)
|
|
बुसुल्फान (मायलेरान)
|
जन्मजात व्यंगे उदा. खालच्या जबड्याची वाढ खुंटणे, क्लेफ्ट पॅलेट, कवटीच्या हाडांचा अनैसर्गिक विकास, पाठीच्या कण्याचे दोष, कानांचे दोष, क्लबफूट वाढ मंदावणे
|
|
क्लोरांबुसिल (ल्युकेरान)br />
|
बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच
|
|
सायक्लोफॉस्फामाइड (लायोफिलिझेड सायटोक्झान)
|
बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच
|
|
मर्काप्टोप्युरिन (प्युरिनेंथॉल)
|
बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच
|
|
मेथोट्रेक्झेट (ट्रेक्साल)br />
|
बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच
|
|
विनब्लास्टिन
|
जन्मजात व्यंगे शक्य(फक्त प्राण्यांमध्येच आढळली आहे)
|
|
विनक्रिस्टिन
|
जन्मजात व्यंगे शक्य (फक्त प्राण्यांमध्येच आढळली आहे)
|
मनस्थिती सावरणारी औषधे
|
लिथिअम (लिथोबिड)
|
नवजात बाळामध्ये जन्मजात व्यंगे (विशेषतः हृदयाची), आळशीपणा, स्नायूंची कार्यक्षमता घटणे, अन्न नीट घेता न येणे, थायरॉइड ग्रंथींचे काम कमी होणे तसेच नेफ्रोजेनिक डायबेटिस इंसिपिडस
|
नॉन-स्टेरॉइडल ऍँटिइंफ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs)
|
ऍस्पिरिन आणि सॅलिसायलेट प्रकारची इतर औषधे इबुप्रोफेन (ऍडव्हिलमॉट्रिन) नॅप्रोक्झेन ( एलेव्हियनाप्रोक्झ्नाप्रोसिन)
|
ही औषधे मोठ्या प्रमाणात घेतल्यास कळा उशीरा सुरू होऊ शकतात, गर्भाची अरोटा आणि फुफ्फुसांपर्यंत जाणारी रोहिणी (डिक्टस आर्टेरियस) ह्यांमधील जोड वेळेआधीच बंद होऊ शकतो, कावीळ तसेच(कधीकधी) मेंदूला इजा होऊ शकते. तसेच बाळ आणि बाळंतिणीला (प्रसूतीआधी किंवा नंतर) रक्तस्त्राव होऊ शकतो. ही औषधे गर्भारपणात उशीराने घेतल्यास वाढणार्या गर्भा भोवतीच्या द्रवाचे प्रमाण कमी होऊ शकते.
|
तोंडावाटे घेण्याची हायपरग्लायसेमीरोधक औषधे
|
क्लोरप्रोप्रामाइड (डायाबिनिज)
|
नवजाताच्या रक्तात साखरेचे प्रमाण अत्यंत कमी गर्भवतीच्या मधुमेहाचे पुरेसे नियंत्रण नाही टाइप 2 प्रकारचा मधुमेह असलेल्या गर्भवतीने हे औषध गर्भारपणाच्या सुरुवातीला घेतल्यास जन्मजात व्यंगांची शक्यता वाढते
|
|
टोलब्युटामाइड
|
क्लोरप्रोप्रामाइडच्या परिणामांप्रमाणेच
|
लैंगिक संप्रेरके
|
डॅनाझॉल
|
गर्भवतीने हे औषध गर्भारपणाच्या अगदी सुरुवातीला घेतल्यास स्त्री गर्भाच्या जननेंद्रियांचे रूपांतर पुरुषी जननेंद्रियांमध्ये होऊ शकते व हे टाळण्यासाठी कधीकधी शस्त्रक्रिया करावी लागते
|
|
डायएथिलस्टिलबेस्ट्रॉल (DES)
|
मुलींना, भावी काळात, गर्भाशयाची व्यंगे, पाळीच्या तक्रारी, योनीच्या कर्करोगाचा वाढता धोका तसेच बाळंतपणाचे वेळी गुंतागुंत. मुलाच्या लिंगामध्ये दोष असण्याची शक्यता
|
|
कृत्रिम प्रोजेस्टिन्स (परंतु तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधकांत वापरतात तितकी कमी मात्रा नव्हे)
|
डॅनाझॉलच्या परिणामांप्रमाणेच
|
त्वचा-उपचार
|
इट्रेटिनेट
|
जन्मजात व्यंगे, उदा. हृदयाच्या समस्या, कान छोटे असणे, हायड्रोसेफालस (मेंदूत पाणी होणे)
|
|
आयसोट्रेटिनॉइन (ऍक्युटेन)
|
इट्रेटिनेटच्या परिणामांप्रमाणेच मानसिक वाढ अपुरी गर्भपाताचा धोका
|
थायरॉइडवरील औषधे
|
मेथिमॅझोल (टापाझोल)
|
गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा कमी कार्यक्षम नवजाताच्या कवटीमध्ये समस्या
|
|
प्रॉपिलथिओयुरॅसिल
|
गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा कमी कार्यक्षम
|
|
किरणोत्सर्गी (रेडिओऍक्टिव्ह) आयोडिन
|
गर्भाची थायरॉइड ग्रंथी नष्ट होणे गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या अखेरीस हे औषध दिल्यास गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा नको तितकी कार्यक्षम बनते
|
|
ट्रायआयोडोथायरॉनिन (थायरोलार)
|
गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा नको तितकी कार्यक्षम
|
लसी (जिवंत विषाणू)td>
|
जर्मन गोवर (रुबेला) आणि कांजिण्यांवरील (व्हेरिसेला) लसी
|
नाळ तसेच वाढत्या गर्भास संसर्गाचा संभाव्य धोका
|
|
गालगुंड, गोवर, पोलिओ किंवा पिवळा ताप यांवरील लसी
|
धोक्यांची शक्यता परंतु ह्यांबाबत जास्त माहिती नाही
|
* तशीच तातडीची निकड नसल्यास गर्भारपणात औषधे घेऊच नयेत. अर्थात काही वेळा गर्भवती आणि गर्भासाठी औषधे घेणे आवश्यक असते. अशावेळी संबंधित महिलेने आपल्या आरोग्यसेवकाशी बोलून औषधांचे फायदे-तोटे समजून घ्यावे.
सामाजिक पातळीवरील औषधे
धूम्रपान व तंबाखू
सिगारेट किंवा विडी ओढल्यामुळे गर्भवती तसेच गर्भाला अपाय होतो हे चांगले माहीत असले तरीही धूम्रपान करणार्याय महिलांपैकी फक्त 20% प्रत्यक्ष गर्भारपणात धूम्रपान सोडतात. गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भावर ठळकपणे दिसणारा परिणाम म्हणजे नवजाताचे वजन अत्यंत कमी असणे. गर्भवती जितके जास्त धूम्रपान करेल तितक्या प्रमाणात नवजाताचे वजन कमी होत जाते. गर्भावस्थेत धूम्रपान करणार्यांरनी जन्म दिलेल्या बाळांचे वजन, धूम्रपान न करणार्यां नी जन्म दिलेल्या बाळांच्या वजनापेक्षा सुमारे 170 ग्रॅमने कमी असते. दीर्घकाळ धूम्रपान करणार्यां महिलांच्या नवजातांचे वजन अधिकच कमी भरते असे दिसते. धूम्रपान करणार्याे महिलांच्या नवजातामध्ये हृदय, मेंदू व चेहर्या ची जन्मजात व्यंगे असण्याचे प्रमाण, धूम्रपान न करणार्याय महिलांच्या नवजातांच्या तुलनेने जास्त असते. तसेच नवजाताच्या अचानक मृत्यूचे (सडन इंफंट डेथ सिंड्रोम - SIDS) प्रमाण वाढू शकते. नाळेची जागा बदलणे (प्लॅसेंटा प्रीव्हिया), वेळेआधीच नाळ तुटणे, गर्भ असलेले अर्धपटल (मेंब्रेन) वेळेआधीच फाटणे, कळा आधीच सुरू होणे, गर्भाशयाचा जंतुसंसर्ग, गर्भपात, मृत मूल जन्माला येणे, वेळेआधीच जन्म होणे इ. बाबींची शक्यता वाढते. ह्याशिवाय, धूम्रपान करणार्याय महिलांची मुलांचा शारीरिक, बौद्धिक तसेच वर्तणूकविषयक विकास इतर मुलांच्या मानाने किंचित परंतु जाणवण्याइतपत कमी असतो. हे परिणाम बहुधा धुरातील कार्बन मोनोक्साइड आणि निकोटिनमुळे होत असावे. गर्भवतींनी इतरांकडून त्यांच्याकडे येणारा धूरदेखील (सेकंडहँड स्मोक) टाळावा कारण त्यामुळेही गर्भावर असेच घातक परिणाम होऊ शकतात.
मद्यार्क (दारू):
नवजातात जन्मजात व्यंगे आढळण्या मागील प्रमुख कारण म्हणजे गर्भावस्थेत मद्यपान करणे. फीटल अल्कोहोल सिंड्रोमसाठी आवश्यक ती दारूची मात्रा संशोधकांना अद्याप माहीत झाली नसल्याने गर्भवतींनी एकंदरीनेच मद्यपान टाळावे हे उत्तम. गर्भावस्थेत दारू पिण्याने फार मोठे परिणाम होतात. गर्भावस्थेदरम्यान दारू पिणार्या महिलांच्या बाबतीत गर्भपाताची शक्यता, न पिणार्याप गर्भवतींच्या मानाने, जवळपास दुप्पट असते – मोठ्या प्रमाणात पिणार्यानचे बाबतीत अजूनच जास्त. बरेचदा गर्भावस्थेत नियमितपणे दारू पिणार्यां्च्या नवजातांचे वजन इतर बाळांपेक्षा खूपच कमी असते – उदा. मोठ्या प्रमाणात दारू पिणार्यांजच्या नवजातांचे सरासरी वजन फक्त 4 पौंड भरते. सामान्यतः हे वजन 7 पौंड असते. तसेच गर्भावस्थेत दारू पिणार्यांनच्या नवजातांची वाढ नीट होत नाही व ते काही काळातच मरून जाण्याची शक्यता असते.
गर्भावस्थेमध्ये दारू पिण्याने होणारा सर्वांत गंभीर परिणाम म्हणजे फीटल अल्कोहोल सिंड्रोम. अधूनमधून म्हणजे दिवसाला तीन पेग्ज घेतल्यानेही हा आजार होऊ शकतो. 1,000 जिवंत नवजातांपैकी सुमारे दोघांमध्ये ही लक्षणे आढळतात. ह्या आजाराची लक्षणे म्हणजे जन्माआधी किंवा जन्मानंतरची अपुरी वाढ, चेहर्यााची व्यंगे, डोके छोटे असणे (बहुधा मेंदूची वाढ कमी झाल्याने), अपुरी मानसिक वाढ तसेच वर्तणूकविषयक विकास नीटपणे न होणे. कधीकधी सांध्याची जागा व वाढ नेहमीसारखी नसते आणि हृदयाचे दोषही आढळतात. गर्भावस्थेत दारू पिणार्याू महिलांची बाळे किंवा वाढत्या वयाच्या मुलांमध्ये वर्तणूकविषयक बर्यावच समस्या दिसतात. उदा. सामाजिकदृष्ट्या अयोग्य वागणे किंवा लक्ष न लागणे (स्थिरचित्त नसणे – अटेंशन डेफिसिट डिसॉर्डर). अशा बाळाला उघड दिसणारी जन्मजात व्यंगे नसली तरीही ह्या समस्या असू शकतात.
कॅफीन:
गर्भावस्थेत कॅफीन म्हणजेच कॉफी प्यायल्याने गर्भाला अपाय होतो की नाही हे अजून निश्चित माहीत नाही. असे दिसते की गर्भावस्थेत कमी प्रमाणात कॅफीन घेतल्याने (उदा. दिवसाला एक कप कॉफी) गर्भाला फारसा धोका नसतो. कॅफीन हे द्रव्य कॉफी, चहा, काही प्रकारचे सोडा, चॉकलेट आणि काही औषधांमध्ये आढळते. कॅफीन हे उत्तेजक (स्टिम्युलंट) आहे व ते नाळेला सहजपणे पार करून गर्भापर्यंत पोहोचते. ह्यामुळे गर्भापर्यंत उत्तेजना पोहोचून त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. कॅफीनमुळे कधीकधी नाळेतून होणारा रक्तप्रवाहदेखील कमी होतो आणि लोह शोषले जाण्याचे पमाणदेखील घटते – ह्यामुळे पंडुरोग उर्फ ऍनिमिया होण्याची शक्यता वाढते. काही वेळा असे दिसले आहे की दररोज सातपेक्षा जास्त कप कॉफी प्यायल्यास मृत मूल जन्माला येण्याचा, अकाली प्रसव होण्याचा, नवजाताचे वजन कमी असण्याचा किंवा गर्भपाताचा धोका वाढतो. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार कॉफीपान मर्यादेत ठेवणे किंवा डीकॅफिनेटेड् म्हणजे कॅफीनचा अंश काढून टाकलेली पेये पिणे चांगले.
ऍस्पार्टेम:
ऍस्पार्टेम हा कृत्रिमरीत्या गोडी वाढवणारा पदार्थ (आर्टिफिशिअल स्वीटनर) आहे. हा गर्भावस्थेत अगदी थोड्या प्रमाणात घेतल्याने फारसा धोका नसतो. उदा. असा पदार्थ असलेले नेहमीचे अन्न वा पेये. परंतु फेनिलकेटूर्निया ह्या वेगळाच आजाराने ग्रस्त असलेल्या गर्भवतींनी कोणत्याही परिस्थितीत ऍस्पार्टेम घेऊ नये.
स्तनपान करवताना औषधे घेणे
बाळास अंगावर पाजणार्याख मातेला एखादे औषध घेणे गरजेचे असल्यास तिने स्तनपान करणे थांबवावे अथवा नाही हे खालील बाबींवर अवलंबून आहे -
- औषध दुधात मिसळण्याचे प्रमाण किती आहे
- हे औषध प्रत्यक्ष बाळापर्यंत पोहोचते आहे काय
- बाळावर औषधाचा काय परिणाम होऊ शकतो
- बाळ किती दूध पिते आहे (हे प्रमाण बाळाचे वय आणि त्याला दिले जाणारे इतर अन्न ह्यावर अवलंबून राहील)
- काही औषधे आईच्या दुधात मिसळत नाहीत. उदा. एपिनेफ्रिन, हिपारिन, इन्शुलिन इ. (ह्यूम्यूलिनोव्होलिन) व त्यामुळे ती घेणे सुरक्षित आहे. बहुसंख्य औषधे आईच्या दुधात मिसळतात परंतु त्यांचे प्रमाण अगदीच कमी असते. अर्थात काही औषधांचे प्रमाण अगदी कमी असले तरीही बाळास अपाय होऊ शकतो. काही औषधे आईच्या दुधात मिसळतातही परंतु प्रत्यक्ष बाळापर्यंत पोहोचणारे प्रमाण नगण्य असल्याने फारसा फरक पडत नाही. उदा. जेंटामायसिन, केनामायसिन स्ट्रेप्टोमायसिन तसेच टेट्रासायक्लिन ही प्रतिजैविके.
सुरक्षित मानली जाणारी औषधे साधारणतः डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी (नॉन-प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज) असतात. परंतु ऍँटिहिस्टामाइन्स ह्याला अपवाद आहेत (सर्दीपडशावरील औषधे, वावड्यावरील (ऍलर्जी) औषधे, गाडी लागण्यावरील औषधे, झोप येण्यासाठीची औषधे इ.मध्ये ही असतात). ऍस्पिरिन आणि इतर सॅलिसायलेट्सचाही समावेश, दीर्घकाळपर्यंत घेतल्यास, ह्यांमध्ये होतो.
त्वचा, डोळे किंवा नाकाला लावली जाणारी औषधे अथवा श्वासावाटे आत घेतली जाणारी औषधे साधारणपणे सुरक्षित असतात. ऍँटिहायपरटेंसिव्ह प्रकारची बहुसंख्य औषधे आईचे दूध पिणार्याा बाळांच्या दृष्टीने बर्यालपैकी सुरक्षित असतात. स्नपान करवणार्याध स्त्रिया बीटा-ब्लॉकर्स घेऊ शकतात परंतु बाळावर त्याचे इतर परिणाम (साइड-इफेक्ट्स) होत नाहीत ना हे वारंवार तपासावे लागते. उदा. हृदयाच्या स्पंदनाचा वेग घटणे, रक्तदाब कमी असणे इ. पूर्ण दिवसांचे व निरोगी बाळ असल्यास (कौमाडिन) घेतले तरी चालते परंतु त्यावर नजर ठेवावी लागते. कॅफीन आणि थिओफायलिन (थिओलेयर) मुळे आईचे दूध पिणार्याे बाळांना त्रास होत नाही परंतु कधीकधी ती चिडचिडी बनतात. बाळाच्या हृदयाच्या स्पंदनाचा तसेच श्वासाचा दर वाढू शकतो. आईचे दूध पिणार्याय बाळांसाठी काही औषधे सुरक्षित मानली जात असली तरीदेखील असा महिलांनी कोणतेही औषध – अगदी औषधाच्या दुकानातील साध्या गोळ्या किंवा वनौषधींदेखील - घेण्यापूर्वी आरोग्यसेवकाचा सल्ला घ्यावा. सर्व औषधांची नावे, लेबल्स इ. तपासून त्यांवर स्नपान करवणार्याी महिलांसाठी काही धोक्याची सूचना इ. नाही ना हे पहावे.
काही औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावी लागतात. स्तनपान करवण्याच्या काळात ती घ्यायची असल्यास गरजेप्रमाणे त्यांचा डोस (मात्रा) कमीजास्त करावा लागतो, त्यांच्या वापरावर काही कालमर्यादा घालावी लागते किंवा ती घेण्याची वेळ स्नपानाच्या वेळेनुसार ठरवावी लागते. बरीचशी ऍँटि-ऍँक्झायटी (चिंतारोधक), ऍँटि-डिप्रेसंट (निराशारोधक) तसेच ऍँटिसायकॉटिक (मनस्थितीविषयक) औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यायची असतात – त्यांचा बाळावर फारसा विपरित परिणाम होणार नसला तरीही. मात्र ही औषधे शरीरत बराच काळपर्यंत राहतात आणि बाळाला, त्याच्या आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांत, ही औषधे शरीरबाहेर टाकणे कठीण जाते आणि अशा वेळी त्यांचा परिणाम बाळाच्या चेतासंस्थेवर होऊ शकतो उदा. (चिंतारोधक) डायझेपाम (डाएस्टॅटव्हॅलिअम) ह्या बेंझोडायझेपिन प्रकारच्या औषधामुळे आईचे दूधपित्या बाळांमध्ये आळशीपणा, मंदपणा किंवा वजन घटण्यासारख्या समस्या दिसू शकतात. आकडीरोधक (ऍँटिकंव्हल्संट) आणि बार्बिट्युरेट असलेले फेनोबार्बिटाल (ल्युमिनाल), हे औषध शरीरातून बाहेर जाण्यास वेळ लागत असल्याने बाळाचा झोपाळूपणा फारच वाढतो. अशा परिणामांमुळे डॉक्टर बेंझोडायझेपिन आणि बार्बिट्युरेट्सचा डोस कमी करतात आणि स्तनपान करवणार्या स्त्रियांनी केलेल्या ह्या औषधांच्या वापरावर नजर ठेवतात.
|