संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे. सर्वप्रथम अनिर्बंध लैंगिक संबंध टाळणे महत्त्वाचे आहे. एकाच व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असते. लैंगिक संबंधातली व्यक्ती एड्सग्रस्त असण्याची शक्यता असेल तर अशा संबंधात निरोध वापरावा. अनावश्यक इंजेक्शने टाळणे महत्त्वाचे. बहुतांश इंजेक्शने अनावश्यक असतात! इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा-या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात. एकदा वापरानंतर त्या मोडून टाकून द्यायला पाहिजेत. रक्तातून हा आजार पसरत असल्याने रक्तपेढयांबद्दल कडक कायदे आहेत. आता एड्ससंबंधी चाचणी केल्याशिवाय रक्त देता येत नाही. रक्त घेण्याची वेळ आल्यास 'निरोगी'माणसाचे रक्त घ्यावे. शक्यतो आपापल्या नात्यातल्या व्यक्ती किंवा मित्रांचे रक्त व तेही दात्याच्या रक्ताची एड्सबाबत तपासणी करूनच घ्यावे लागते. व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्त हल्ली घेतले जात नाही हे चांगलेच आहे.
इंजेक्शनद्वारे मादक पदार्थ घ्यायचे व्यसन असणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. आपल्या देशात आसाम, मणिपूर, इ. भागात या प्रकारची मोठी समस्या आहे. व्यसन सुटत नसेल तर त्यांना निर्जंतुक सुया उपलब्ध करण्याची गरज आहे.
अंतिम सुधारित : 10/7/2020
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्ण...