অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मतिमंदता

मतिमंदता / मानसिक विकासा मध्ये कमी


मतिमंदता म्हणजे बौद्धिक कार्याच्या पातळीत (बुद्ध्यांक मोजण्याच्या प्रमाणित चाचण्यांनुसार), रोजच्या जीवनावश्यक कौशल्ये पार पाडण्यामध्ये व ती आत्मसात करण्यामध्ये मोठी कमतरता असणे.

वर्णन

  • ‘सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल ऑंड प्रिवेंशन’ नुसार, १९९०च्या दरम्यान, मतिमंदता हे सामान्य जनतेमध्ये २.५ ते ३ टक्के लोकांमध्ये आढळते. मतिमंदता बालपणामध्ये किंवा किशोरावस्थेमध्ये १८ वर्ष वयाच्या आधी सुरू होते.
  • ही युवकावस्थामध्ये सुद्धा चालू राहते. बौद्धिक कार्याचे पातळी हे प्रमाणिक परीक्षेने मोजमाप करून (वेस्लर – बौद्धिक स्तर मोजपट्टी) ज्याने मानसिक वयामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता मोजले जाते. (बुद्ध्यांक किंवा आयक्यू - IQ) एखाद्या मनुष्याचे मतिमंदतेचे निदान तेव्हा केले जाते जेव्हा त्याचे बौद्धिक कार्याचे पातळी एक किंवा जास्त अनुकूलक कार्यामध्ये मध्यवर्ती आणी सार्थक प्रतिबंधापेक्षा कमी असते.
  • मतिमंदता म्हणजे आयक्यू स्कोअर ७० ते ७५.
  • अनुकूलक कुशलता म्हणजे रोजचे कार्य करण्याची कुशलता. या मध्ये उत्पादक कार्य आणी भाषा समजण्याची क्षमता (संवाद); जीवन निर्वाहाची कुशलता; सामाजिक संसाधनाचे वापर; आरोग्य, सुरक्षितता, करमणूक, स्वतःची काळजी घेणे आणि सामाजात असण्याचे क्षमता; स्व- निर्देशन; कार्यात्मिक सिद्धांत विषयक क्षमता (वाचणे, लिहिणे आणि गणित); आणि कार्यक्षमता.
  • साधारणपणे मतिमंदता असणारी मुले, चालणे आणि बोलण्या सारखे विकासाचे महत्त्वाचे टप्पे, सामान्य जनतेपेक्षा फार वेळाने पार पाडतात.
  • मतिमंदता असण्याचे लक्षण जन्माच्या वेळी किंवा नंतर बाल्यावस्थे मध्ये दिसून येऊ शकतो.
  • लक्षण दिसण्यास सुरू होण्याचा वेळ अक्षमतेच्या संशयास्पद कारणावर अवलंबून असतो.
  • काही सौम्य मतिमंदतेचे निदान मूल शाळेत जाण्या पर्यंत होत नाही.
  • ही मुले साधारणपणे सामाजिक, संवाद, आणि कार्यात्मिक सिद्धांत विषयक क्षमतेत कमी पडतात.
  • मेंदूसंबंधी (न्यूरोलोजिक) अव्यवस्था उदा. मस्तिष्ककोप (एनसिफेलाइटीज) किंवा मस्तिष्क ज्वर (मेनिंजाइटीज) असणा-या मुलांमध्ये अचानक संज्ञानात्मक दुर्बलता आणि अनुकूलक अडचणीची लक्षणे दिसून येऊ शकतात.

मतिमंदतेचे विभाग

मतिमंदतेमध्ये सारासार विचारक्षमता मानसिक वयामध्ये मोजले जाते (बुद्ध्यांक किंवा आयक्यू). मतिमंदतेचे चार वेगळे वर्ग आहेत; सौम्य, मध्यम, गंभीर आणि अतिगंभीर. हे वर्ग मनुष्याच्या कार्यात्मक पातळीवर अवलबून आहेत.

सौम्य मतिमंदता

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये सरासरी ८५ टक्के लोकांमध्ये सौम्य पद्धतीची मतिमंदता असते. त्यांचा आयक़्यू स्कोअर ७० ते ७५ पर्यंत असतो, आणि ते बहुदा सहावी इयत्ते पर्यंतचे सिद्धांत विषयक कुशलता प्राप्त करतात. ते पुरेसे आत्मनिर्भर होतात आणि काही मामल्यांमध्ये सामाजिक आणि सामुहिक आधारात स्वतंत्र राहू शकतात.

मध्यम मतिमंदता

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये अंदाजे १० टक्के लोकांमध्ये मध्यम पद्धतीची मतिमंदता असते. मध्यम पद्धतीचा मतिमंदता असणा-या लोकांमध्ये आयक़्यू स्कोअर ३५ ते ५५ असतो. ते मध्येम देखभाल मध्ये आपले काम आणि आत्म देखरेख करू शकतात. ते बालपणात विशिष्ट संवाद कुशलता प्राप्त करतात आणि समाजात, देखरेखीखाली, समूह घरात (ग्रूप होम) मध्ये राहू व कार्य करू शकतात.

गंभीर मतिमंदता

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये अंदाजे ३ ते ४ टक्के लोक अति प्रमाणात मतिमंदता असलेले असतात. त्यांचा आयक़्यू स्कोअर २० ते ४० असतो. ते अगदी प्राथमिक आत्म-देखरेख आणि संवाद कुशलतेत निपुण होऊ शकतात. गंभीर प्रमाणात मतिमंदता असलेल्या व्यक्ती समूह घरात राहू शकतात.

अतिगंभीर मतिमंदता

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये फक्त १ ते ३ टक्के अतिगंभीर प्रमाणात मतिमंदता असलेले असतात. त्यांचा आयक़्यू स्कोअर २० ते २५ असतो. योग्य आधार आणि प्रशिक्षणाने त्यांना अगदी प्राथमिक आत्म देखरेख आणि संवाद कुशलता प्राप्त होऊ शकते. त्यांची मतिमंदता बहुदा मेंदूसंबंधीच्या (न्यूरोलोजिक) अव्यवस्थतेमुळे होते. गंभीर प्रमाणात मतिमंदता असलेल्या लोकांना उच्च स्तराचे संरचना आणि देखभाल आवश्यक आहे.

मतिमंदता होण्याची कारणे

प्रसवपूर्व

  • गुणसूत्र-संबंधी अव्यवस्था: डाउन्स सिंड्रोम*, फ्रजाईल एक्स सिंड्रोम, प्राडर विली सिंड्रोम, क्लिनफेल्टर्स सिंड्रोम
  • सिंगल जीन डिसऑर्डर: जन्मजात चयापचय प्रक्रिया (metabolism) मध्ये दोष असणे उदा. गॅलेक्टोसेमिया, फिनिलकिटोन्यूरिया, हायपोथायरॉयडिजम, म्यूको पॉलीसॅकरायडॉसिस, टे सॅक्स डिसीज.
  • न्यूरो क्यूटॅनियस सिंड्रोम: ट्यूबरस स्क्लेरॉसेस, न्यूरो फायर्बोमॉटोसिस
  • डिसमॉर्फिक सिंड्रोम: लॉरेंस बेडिल सिंड्रोम
  • मेदूची विकृत रचना: मायक्रोसिफॅली, हायड्रोसिफॅलस, माइलो मेनिंगोसिले
आईच्या असाधारण परिस्थितीचे परिणाम
  • अभाव: आयोडीनची कमतरता आणि फोलिक ऑसिडची कमतरता, गंभीर कुपोषण
  • पदार्थांचा वापर: मद्य, निकोटीन, कोकेन
  • हानिकारक रसायनांशी संपर्क येणे: प्रदूषक पदार्थ, जड धातू, हानिकारक औषधे उदा. थॅलिडोमाईड, फिनिटोइन, वारफॅरिन, सोडियम, इ.
  • मातेला असलेले संसर्गजन्य रोग: रुबेला, टोक्सोप्लासमोसिस, सायटोमेगॅलोवायरस संक्रमण, सिफिलिस, एच आय वी
  • रेडिएशन (आण्विक प्रारण) शी संपर्क येणे आणि Rh विसंगती
  • गर्भारपणातील गुंतागुंती: गर्भावस्थेमुळे प्रेरित उच्च रक्तदाब, गर्भावस्थेत झालेले रक्त स्राव, नाळीचे काम नीट न चालणे
  • मातेला असलेले रोग: मधुमेह, ह्रदय रोग आणि मूत्रपिंडाचे रोग.
प्रसूतीच्या वेळेस

कठीण आणि/ किंवा गुंतागुंतीची प्रसूती, वेळेच्या फारच आधी प्रसूती होणे, जन्माच्या वेळेस बाळाचे वजन खूप कमी असणे*, प्रसूतीच्या वेळेस प्राणवायू कमी पडणे*, प्रसूतीच्या वेळेस बाळाला इजा होणे.

  • जन्मानंतरचे दिवस: सेप्टीसेमिया, पांडुरोग, हायपोग्लायसेमिया, नवजात शिशूला झटके येणे
  • शैशत्व आणि बालपण:मेंदुचे रोग उदा. क्षयरोग, जॅपेनीज एनसिफलाइटीज, जीवाण्विक मस्तिष्क ज्वर (मेनिंजायटिज) डोक्याला आघात, शिसे धातूशी दीर्घकालीन संपर्क येणे, गंभीर आणि दीर्घकालीन कुपोषण, खूप कमी उत्तेजना

[टीप - अशी परिस्थिति नक्की किंवा साधारणपणे थांबवता येते]

मतिमंदतेची लक्षणे

  • बौद्धिक विकासाची चिन्हे दाखवण्यात असफल होणे
  • विकासाची चिन्हक लक्षणे उदा. वेळेवर बसणे, रंगणे, चालणे, किंवा बोलणे इ. न दिसणे
  • बालिश वागणूक चालूच राहणे बोलण्याच्या शैलीमध्ये, किंवा सामाजिक नीतिनियम आणि स्वतःच्या वागणुकीचे परिणाम समजण्यात असफल होणे
  • कुतूहल नसणे आणि समस्यानिवारण न करता येणे
  • शिकण्याची क्षमता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता कमी असणे
  • विषय आठवण्यास त्रास होणे
  • शाळेला जाण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण न करू शकणे

उपचार

  • मतिमंदतेवरचे उपचार हे विकार पूर्णपणे बरा करण्यासाठी योजलेले नसतात. किंतु, परंतु उपचार हे धोके कमी करण्याचे आहेत (उदा. एखाद्या व्यक्तीला घरी किंवा शाळेत सुरक्षित राहण्यास मदत करणे) आणि उपयुक्त व अनुरूप जीवन शैली शिकवणे. अंमलबजावणी व्यक्तीच्या आणि त्यांच्या परिवाराच्या विशिष्ट गरजांवर अवलंबून असायला पाहिजे. व्यक्तीचे सामर्थ्य जास्तीत जास्त वाढणे हे त्याचे मूलभूत उद्दिष्ट असले पाहिजे.
  • याबरोबर होणार्‍या आणखी काही व्याधी उदा. आक्रमकता, मनाचा कल बदलणे, स्वतःला हानीकारक असेल असे वागणे, वर्तणुकीच्या इतर समस्या, आणि झटके येणे जे ४०% ते ७०% प्रकरणांमध्ये दिसते, यासाठी औषधोपचार आवश्यक आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate