অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्पर्शज्ञान

त्वचेशी किंवा श्लेष्मल ( बुळबुळीत ) पटलाशीसंपर्क आल्यामुळेसंवेदना होतात, त्यांपैकी स्पर्शाची संवेदना मानवप्राण्यामध्ये अतिशय विकसित अवस्थेमध्ये आढळते. शरीराच्या बर्‍याचशा भागांवरील केसांचेकमी झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळेच गंधज्ञान, ध्वनिसंवेदन व दृष्टी यांसारख्या विशेष संवेदनांचीकितीही कमी झाली, तरी मनुष्य स्पर्शज्ञानाच्या साह्याने आपले बरेच दैनंदिन व्यवहार व्यवस्थित पार पाडू शकतो. स्पर्शाचेनिर्माण होण्यासाठी संदेशवाहक तंत्रिका तंतूंच्या ( मज्जातंतूंच्या ) टोकांशी अनेक प्रकारचीइंद्रिये म्हणजेच स्पर्शग्राही विकसित झालेली आढळतात. त्वचेच्या पृष्ठभागाखाली सर्वदूर पसरलेल्या या ग्राहींमध्ये हलक्या स्पर्शाबरोबरच अधिक जोराचाकिंवा खोलवर दाब आल्याचे संवेदन आणि कंपनाचे संवेदन ग्रहण करण्याचीहीअसते.

स्पर्शग्राहींचे प्रकार

स्पर्शग्राहींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

  1. तंत्रिका तंतूंची मुक्त अनाच्छादित टोके; उदा., डोळ्याच्यास्वच्छ मंडलातील व त्वचेच्या काही भागांतील स्पर्शग्राही. हासर्वांत अविकसित म्हणता येईल.
  2. केसविरहित त्वचेवरील ( उदा., ओठ, तळहात, तळपाय, बोटे इ. ) लांबट कोषांमध्ये बंदिस्त तंतुसदृश तंत्रिका, माइसनर कणिका या नावाने ओळखली जाणारीअतिशय संवेदनशील असून पृष्ठभागावरील पदार्थाचीव ८० हर्ट्झपेक्षा कमी कंप्रतेची कंपने तसेच स्पर्श करणार्‍या वस्तूचे( त्रिमितीय वैशिष्ट्ये ) यांचे ज्ञान करून देण्यास मदत करते.
  3. केसाळ त्वचेमधील मर्केल चकती तंत्रिकांची पसरट टोके असलेलेअनेकदा त्वचेच्या सूक्ष्म उंचवट्यांखाली एकवटलेले असतात. वस्तूचे स्थान निश्चित करण्यास आणि तिचाजाणण्यास त्यांची मदत होते.
  4. केसांच्या मुळांभोवती विळखा घालून त्यांच्या किंचित हाल-चालींनीहोणारे केशसंलग्न स्पर्शग्राही. केसाळ त्वचेवरील वस्तूची हालचाल त्यामुळे जाणवते.
  5. त्वचेच्या खोलवरच्या स्तरातील आणि सांध्यांच्या कोषांभोवती असलेल्या ऊतकातील स्पर्शग्राही. रुफिनी यांच्या नावाने ज्ञात असलेल्या या ग्राहींची रचना तंत्रिका तंतूंच्या अनेक सूक्ष्म शाखांना कोषांमध्ये बंदिस्त केल्यासारखी असते. जोराचा दाब आणि जड व भारयुक्त स्पर्श यांमुळे हेसतत स्पर्शाचीकरून देत राहतात. कारण वर वर्णन केलेल्या सर्व स्पर्शग्राहींप्रमाणे त्यांच्या संवेदनेचे अनुकूलन ( सवय होणे ) त्वरित होऊ शकत नाही.
  6. पाचीनी कणिका या नावाने ओळखले जाणारे स्पर्शग्राही. एक मध्यवर्ती तंत्रिका तंतू आणि त्याभोवती एकावर एक असे अनेक पापुद्य्रां-सारखे पटलांचेअशी रचना असलेले हे ग्राही संयोजी ( जोडणार्‍या ) ऊतकांच्या त्वचेखालील आणि अधिक खोलवरच्या थरांत असतात. ऊतकांच्या हालचालींनी उत्तेजित होणारे हे ग्राही अतिजलद ( ८०० हर्ट्झपर्यंतच्या ) कंपनांची जाणीव करून देऊ शकतात. त्यांचे संवेदन विनाविलंब अनुकूलन दर्शविते.

तंत्रिका तंतू

स्पर्शग्राहींकडून ग्रहण केलेले स्पर्शाचे संवेदन तंत्रिकेमध्येआवेगात रूपांतरित होते. संदेशवहनासाठी निरनिराळ्या प्रकारचे तंत्रिका तंतू उपलब्ध असतात.

शस्त्रक्रियेसाठी एखादाबधिर केला जातो किंवादिली जाते, तेव्हा वेदना आणियांचे संवेदन प्रथम जाते. त्यानंतर काही वेळ स्पर्शाची जाणीव होत राहते; परंतु या जाणिवेचे अनुकूलन लवकर होत असल्याने रुग्णाला काही वेळानंतर आपल्या शरीराला हाताळले जात असल्याची जाणीवही होत नाही. याउलट उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्यास हेच संवेदन अधिक तीव्र होते.आणि संभ्रमकारक द्रव्यांच्या सेवनानंतर स्पर्श संवेदनाचालावण्यात दोष निर्माण होऊन अपसंवेदनामुळे व्यक्ती अतिसंवेदनशील होते किंवा स्पर्शाने वेदना किंवा तापमानातील बदलासारखी जाणीव होऊ शकते. मनोविकारांमुळेही अपसंवेदन उद्भवू शकते.

 

लेखक : दि. शं श्रोत्री

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate