संधिशोथ म्हणजे काय ?
संधिशोथ म्हणजे संधींचा दाह. सांध्यातील वेदना, कडकपणा आणि सूज (असतील किंवा नसतील) निर्माण करणा-या संधिरोगांच्या समूहाचा उल्लेख या नांवाने होतो.
संधिशोथाचे तीन सामान्य प्रकार याप्रमाणेः
- संधिवाताभ संधिशोथ
- हाडांचा संधिशोथ
- संधिवात
संधिशोथाची लक्षणे
- एखाद्या संधीमधे वेदना किंवा बधीरपणा (वेदना किंवा दबाव) येतो जी चालणे, खुर्चीतून उठणे, लिहीणे, टायपिंग करणे, एखादी वस्तु धरणे, भाज्या चिरणे इत्यादी हालचालींमुळं अधिक वाढते.
- सांधे सुजणे, कडक होणे, लालसरपणा आणि किंवा गरम होणे यांच्याव्दारे दिसून येणारा दाह.
- विशेषतः सकाळी कडकपणा जाणवणे
- संधिंची लवचिकता कमी होणे
- संधिंची मर्यादित हालचाल
- संधिंमधे विक़ृती येणे
- वजन कमी होणे आणि थकवा
- अविशिष्ठ ताप
- करकरणे (हालचाल केल्यावर अस्थीसंधिंमधे होणारा करकरण्याचा आवाज)
संधिशोथाचं व्यवस्थापन कसं करावं ?
सुयोग्य व्यवस्थापन आणि प्रभावी उपचारांनी संधिशोथासह आयुष्य जगणे सुसह्य होऊ शकते.
- संधिशोथाबद्दल माहिती घेणेः या समस्येची पूर्ण माहिती घेतल्यास त्याचं व्यवस्थापन करण्याव्दारे विकृती आणि इतर गुंतागुंत टाळता येते.
- रक्ताच्या चाचण्या आणि क्ष-किरण तपासणीव्दारे संधिशोथावर देखरेख ठेवणे
- डॉक्टरांनी सल्ला दिल्यानुसार नियमितपणे औषधे घेणे
- शरीराचं वजन नियंत्रित करणे
- चांगला आहार घेणे
- डॉक्टरांनी सूचना दिल्याप्रमाणे नियमितपणे व्यायाम करणे
- नियमित व्यायामाव्दारे तसेंच शिथिलीकरणाचे उपाय, पुरेशी विश्रांती घेणे, कामाचे नियोजन करणे यांच्याव्दारे तणाव आणि थकवा दूर ठेवणे
- औषधांच्या सेवनासोबतच योग आणि इतर पर्यायी उपचार पध्दतींचा वापर उपयुक्त ठरतो हे सप्रमाण सिध्द करण्यात आले आहे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम् अंतिम सुधारित : 8/9/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.