अधूनमधून दुखणारे कोपर किंवा गुडघ्यांमागे दिवसभर केलेले परिश्रम नाही तर इतर त्यामागे इतर कारणेही असू शकतात. संधिवात हा केवळ ज्येष्ठांचा आजार आहे, हे मिथक मोडून काढ या आजाराने तरूणाईलाही लक्ष्य केले आहे. त्यातच ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस हा संधिवाताचा प्रकार तुम्हाला अंथरूणाला खिळवून ठेवू शकतो...
संधिवात म्हणजे आर्थ्रराइटिस हा भारतातील एक उग्र समस्या बनू पाहात आहे. साठीनंतर सांधेदुखीमुळे काठी हाती येते, असे गंमतीने म्हटले जाई. परंतु, आता वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत हा आजार ऐन भरातील तरूणांनाही खिळवून ठेऊ लागला आहे. संधिवाताच्या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रकारांपैकी ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस हा प्रकार ऑस्टिओपोरोसिस आणि गाउट या प्रकारांपाठोपाठ आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संधिवाताच्या या प्रकारामुळे जगातील ०.३ ते १ टक्के लोकसंख्या या विकाराने ग्रस्त आहे. याचा अर्थ भारतातील तब्बल १० कोटी नागरिक याने ग्रस्त आहेत.
ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस हा रोग प्रतिकारशक्तीचा एक विकार असून ज्यात शरीर आपल्याच सांध्यांवर आक्रमण करायला सुरूवात करते. यामुळे सांधे आणि क्वचित हृदयालाही इजा होऊ शकते. लवकर निदान आणि योग्य उपचार ही सांधेदुखीच्या या प्रकाराशी लढा देण्याची गुरूकिल्ली आहे.
साधारण, साठीनंतर ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस उद्भवू शकतो, असे म्हटले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांत हे वय झपाट्याने खाली येते आहे. तिशीतही संधिवात छळू लागला आहे. परंतु, कुठल्याही वयात, कितीही वेगाने हा आजार आपले हातपाय पसरू शकतो. महिला आणि पुरूषांमध्ये तुलना करायची झाल्यास महिलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता पुरूषांच्या तुलनेत अडीचपट असते. आनुवंशिकता, जीवनशैली यांच्यासह हॉर्मोन्सही याला कारण असू शकतात असे संशोधकांचे मत आहे. यामुळेच पुरूषांच्या तुलनेत महिलांना या विकाराला अधिक सामोरे जावे लागते असा कयास आहे.
कारणे
ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस नेमका कशामुळे होतो यावर अजून वैद्यकीय क्षेत्रात खल सुरू आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत आहे. या आजारात सांध्यांमधील संधिपेशींवर (सिनॉव्हिअल टिश्यू) परिणाम होतो. इतकेच आजवर माहीत झाले आहे. सांध्यांवर अतिताणामुळे या प्रकारचा संधिवात होत नाही, हे स्पष्ट आहे. स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घेणाऱ्या अनेक रूग्णांमध्येही हा आजार आढळतो.
जर सांधेदुखी आणि सूज असह्य झाली, आणि सांध्यांनी काम करणे बंद केले तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. अशावेळी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येते. खुब्याचे हाड आणि गुडघ्यांमध्ये आणि काहीवेळा खांद्यांवर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेमुळे सांधेदुखीने ग्रासलेल्या व्यक्तीला तात्काळ दिलासा मिळू शकतो. ऑक्सिडाइज्ड झिरकोनिअम सारख्या कृत्रिम सांध्याचे आयुर्मान तर ३० वर्षांपर्यंत असते. असे सांधे तरूण रूग्णांना लावून उर्वरित आयुष्य वेदनामुक्त होऊ शकते.
कुठल्याही प्रकारच्या सांधेदुखीवरील उपचारांमध्ये या दोन्ही उपचारांचे महत्त्व अधिक आहे. भौतिकोपचारामुळे सांध्याची नियमित आणि शास्त्रोक्त हालचाल होण्यास मदत होते. व्यवसायोपचाराच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील काम अधिक सोपी होण्यास मदत होते, तसेच आपण पुन्हा कामावर जाण्यासाठी मनोबल वाढवण्यात त्याची मदत होते.
डॉ. संजय आगरवाल, अस्थिविकार आणि सांधेरोपणतज्ज्ञ
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स
अंतिम सुधारित : 12/6/2019
संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे. यालाच संधि...
संधिशोथ म्हणजे संधींचा दाह. सांध्यातील वेदना, कडकप...
सांधेदुखी व सांधेसूज यांत फरक असतो. सांधे सुजलेले ...
संधिवाताभ संधिशोथ म्हणजेच -हुमॅटॉईड आर्थ्रायटीस ही...