অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विषमज्वर (टायफॉईड)

विषमज्वराचा ताप हा जीवघेणा आजार असून तो साल्मोनेला टायफी या जीवाणुमुळे होतो. विषमज्वर टाळता येऊ शकतो आणि त्यावर प्रतिजैविकांनी उपचार करता येऊ शकतो.

विषमज्वर हा कसा पसरतो

साल्मोनेला टायफी विषाणू हा केवळ माणसांमधे राहतो. हा विषाणू विषमज्वर झालेल्या व्यक्तींच्या रक्तात आणि आतड्यांत असतो. त्याशिवाय, काही लोक, ज्याना वाहक असं म्हणतात, विषमज्वरातून बरे होतात परंतु त्यांच्या शरीरात हा विषाणू असतो. आजारी व्यक्ती तसंच वाहक हे त्यांच्या विष्ठेव्दारे हा जीवाणू बाहेर टाकत असतात.

असे विषाणू बाहेर टाकत असलेल्या व्यक्तीने हाताळलेले अन्न आपण खाल्ल्यास किंवा भांडी धुण्यासाठी अथवा पिण्यासाठी आपण वापरत असलेल्या पाण्यात हा विषाणू गेल्यास आपल्याला विषमज्वर होऊ शकतो.  त्यामुळे, जगामधे हात धुणे कमी आहे आणि पाण्यामधे सांडपाणी मिसळल्याचा धोका असेल अशा भागांमधे विषमज्वर सहजपणे आढळतो.

एकदा का हा विषाणू पाणी किंवा अन्नाव्दारे शरीरात शिरला की त्यांची संख्या वाढते आणि ते रक्तात पसरतात.  त्यावेळी शरीर हे ताप आणि इतर चिन्हे तसंच लक्षणांव्दारे प्रतिक्रीया देते.

विषमज्वराची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत

विषमज्वर झालेल्या रुग्णाच्या अंगात सामान्यतः 103 अंश ते 104 फॅरेनहाईट (39 ते 40 अंश) ताप सतत असतो. त्यांना अशक्त वाटते, किंवा पोटात वेदना असतात. डोकेदुखी किंवा भूक कमी लागणे अशी लक्षणे दिसतात. काही प्रकरणी, रुग्णांना चपटे गुलाबी रंगाच्या ठिपक्यांचे पुरळ उठते. विषमज्वराचे निदान करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या व्यक्तीची विष्ठा किंवा रक्त तपासणे

आपण विषमज्वर कसा टाळू शकता

दोन मूलभूत कृती आपल्याला विषमज्वरापासून वाचवू शकतात

  1. धोकादायक अन्न आणि पेयं टाळावीत
  2. विषमज्वरावरील लस टोचून घ्यावी. पाणी 1 मिनिटे खळखळून उकळेल इतके गरम करुन मगच प्यावे.  खावयाचा बर्फ हा बाटलीबंद किंवा उकळलेल्या पाण्यापासून बनवलेला नसेल तर पेयांमधे बर्फ घालू नका.  सुगंधी बर्फ टाळा कारण तो दूषित पाण्यापासून बनवलेला असतो.
  3. जे पदार्थ पूर्णतः शिजवलेले असतात आणि जे अद्याप गरम आणि वाफाळलेले असतात तेच खा.
  4. कच्च्या भाज्या आणि सोलता न येणारी फळे खाऊ नका. सालीटसारख्या भाज्या सहजपणे दूषित होतात आणि त्या चांगल्या प्रकारे धुता येत नाहीत.  सोलता येतील अशा कच्च्या भाज्या आणि फळे आपण खाता तेव्हा त्या तुम्ही स्वतः सोला (त्याआधी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा).  साली खाऊ नका.  अन्नपदार्थ स्वच्छ ठेवले नसतील तिथून ते किंवा पेयं घेऊ नका.
  5. आपल्याला लस टोचून घेणे आवश्यक आहे.  विषमज्वराच्या लसींचा प्रभाव अनेक वर्षांनंतर कमी होतो, याआधी आपल्याला लस टोचली असेल तर, आता बूस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे का ते डॉक्टरांसोबत ठरवा.  प्रतिजैविके घेण्याने विषमज्वर टाळता येणार नाही, त्यांची केवळ उपचारात मदत होते.

लसीचे नांव

कशी दिली जाते

आवश्यक डोसची संख्या

डोसच्या मधला काळ

लसीकरता काढून ठेवावयाचा एकंदर कालावधी

लसीकरणासाठी किमान वय

बूस्टर आवश्यक

Ty21a (विव्होटीफ बर्ना, स्विस सिरम आणि लस संस्था)

महिन्याला  1 तोंडावाटे गोळी

4

2 दिवस

2 आठवडे

6 वर्षे

5 वर्षे

ViCPS (टायफिम  Vi, Pasteur Merieux)

इंजेक्शन

1

N/A

2 आठवडे

2 वर्षे

2 वर्षे

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम्

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate