अन्न गिळताना, पाणी पिताना गळयाची जी घाटी वरखाली होते तेच स्वरयंत्र असते. स्वरयंत्रापासूनच श्वासनलिकेची सुरुवात होते. स्वरयंत्राची दोन कामे असतात.
हवेशिवाय दुसरा कोठलाही पदार्थ श्वासनलिकेत जात असल्यास आकसून रस्ता बंद होतो किंवा खोकल्याने (ठसका) तो पदार्थ बाहेर ढकलला जातो. स्वरयंत्राचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे हवेच्या मदतीने आवाज काढणे. यासाठी त्यात दोन स्वरस्नायू असतात. हे स्वरस्नायू ताणून उंच स्वर काढता येतो.सर्दी-पडसे, घसासूज. श्वासनलिका दाह, इत्यादी आजारांबरोबर जिवाणू दोषामुळे स्वरयंत्रसूज येते. यासाठी जंतुविरोधी कोझाल, टेट्रा, इत्यादी औषधांनी थांबते. गाणी-भजने, इत्यादींमुळे येणारी सूज स्वरयंत्राला चांगली विश्रांती दिली, की बहुधा आपोआप थांबते. याबरोबर गरम पाणी पिणे, दूध-हळद याचाही चांगला उपयोग होतो. मात्र 10-15 दिवसांतही आराम पडत नसल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे. ढांस (कोरडा खोकला) थांबत नसल्यास कोडीन गोळी द्यावी.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...