অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायनसदुखी

रोगनिदान

नाकाच्या पोकळीच्या वर,बाजूला, मागे आणि मेंदूखाली अशा प्रत्येकी चार-चार पोकळया असतात. त्या नाकाला जोडलेल्या असतात. या पोकळयांनाच सायनस म्हणतात. या पोकळया हाडांमध्ये असतात. निरोगी अवस्थेत या पोकळया हवेशीर व रिकाम्या असतात. सर्दीपडशात या पोकळयांची नाकात उघडणारी तोंडे सुजून बंद होतात. त्यामुळे पोकळयांतल्या आवरणालाही सूज येते. यामुळे डोके 'जड' वाटते. सर्दीपडसे कमी झाले, की या पोकळयाही मोकळया होऊन बरे वाटते.

सर्दीपडशात काही वेळा या पोकळयांमध्ये दाह सुरू होतो. बहुधा हा दाह जिवाणूंमुळे होतो. जेथे दाह होतो ती पोकळी जड होते व नंतर पू भरून ठणकते. जी पोकळी ठणकते त्यावर दाबल्यावर दुखरेपणा आढळतो. डोळयाखालच्या किंवा कपाळावरच्या सायनस पोकळयांचे दुखणे अशाने सहज समजते. मात्र नाकामागील अंतर्भागात पोकळी सुजली असेल तर वरून कळत नाही. अशा वेळी फक्त डोके ठणकत राहते. ही डोकेदुखी बहुधा कानापुढच्या खोलगट भागात असते.

उपचार

सायनसदुखीत पेनिसिलीन किंवा टेट्रा किंवा कोझाल गोळया देऊन जंतुदोष आटोक्यात आणता येतो. डोकेदुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅमाल गोळया द्याव्यात. दाह आटोक्यात आला तर चार-पाच दिवसांत जडपणा कमी होऊन सायनसदुखी बरी होते. काही वेळा मात्र औषधे देऊनही सायनससूज बरी होत नाही. अशा वेळी कानाच्या तज्ज्ञाकडे पाठवा. कानाघ तज्ज्ञ सायनसमध्ये नळी घालून ते धुऊन काढतात. हा उपचार जास्त प्रभावी असतो.

होमिओपथी निवड

हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला,सिलिशिया

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate