हा आजार विषाणूंमुळे होतो. बर्ड फ्लू चे नाव आपण ऐकले आहेच. हा पक्ष्यांना होतो. क्वचित माणसाला होतो.
रोगाचे कारण - या विषाणूचे ए बी सी असे उपप्रकार आहेत यापैकी ए जातीचे विषाणू माणसासाठी जास्त घातक असतात. साधारणपणे फ्लू हा आजार माणसा माणसांत फिरत राहतो. या आजाराचा प्रसार एकमेकांमध्ये श्वासावाटे आणि स्पर्शित वस्तूंद्वारे होतो. यामुळे श्वसनसंस्थेचा आतून दाह सुरु होतो. एकूण आजार 3-5 दिवस टिकतो.फ्लू हा आजार तुरळक प्रमाणात होतच असतो. मात्र पूर्वी याच्या जागतिक साथी येऊन गेलेल्या आहेत. या साथींमध्ये लाखो लोक दगावले हा इतिहास आहे. आपण बर्ड फ्लू चे नाव ऐकलेच आहे. हा फ्लू पक्षांना तर मारतोच पण तो माणसांमध्ये शिरला तर घातक ठरु शकतो. म्हणूनच बर्ड फ्लू च्या साथींमध्ये मोठया प्रमाणावर माणसांना वाचवण्यासाठी कोंबडया नष्ट कराव्या लागतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 5/22/2020
स्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, ह...
बर्ड फ्लू, किंवा डेंगू आजारासंबंधी आपण वाचले असेलच...
वर्षभर येणा-या रुग्णांच्या नोंदी करीत गेल्यावर वर्...
सध्या भारतात जागोजागी स्वाईन फ्लू ची साथ आहे, अनेक...