या रोगात जननेंद्रियावर दुखणारा व्रण तयार होतो म्हणून त्याला
'दुखरा व्रण' असे आपण म्हणू या. हा आजार जिवाणूंमुळे होतो. हा व्रण पुरुषांमध्ये जननेंद्रियाच्या टोकावर किंवा त्वचेखाली, तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडावर किंवा योनिमार्गात कोठेही येऊ शकतो. हा व्रण लालसर
, मांसल दिसतो. व्रणास धक्का लागल्यावर त्यातून थोडा रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्याच्या कडा लालसर असतात. सिफिलिसप्रमाणे या व्रणाचा तळ घट्ट नसतो तर मऊ असतो. बहुधा असे एकाहून अधिक व्रण आढळतात. यानंतर जांघेमध्ये ठणकणारे अवधाण येते. त्यात पू होऊन नंतर त्वचेवाटे तो बाहेर पडतो व ही जखम बरेच दिवस राहते. योग्यवेळी उपचार न झाल्यास जननेंद्रियावरची त्वचा आक्रसते व लघवीचे छिद्र बारीक होते. योग्य उपचाराने आजार पूर्ण बरा होतो.
उपचार
यासाठी इमायसिन (7 दिवस) किंवा सिप्रोचा उपचार (1 दिवस) दिला जातो. याऐवजी डॉक्सी किंवा कोझालच्या गोळया (दहा दिवस) दिल्यानेही उपयोग होईल. ह्यावर उपचार करताना हा सिफिलिसचा व्रण नाही याबद्दल खात्री करणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/18/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.